शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

टिळक रोड लैंगिक अत्याचार; प्रमुख आरोपी गजाआड

By admin | Published: April 18, 2017 1:40 AM

अकोला : टिळक रोडवरील त्रिवेणीश्वर कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावर दहा वर्षीय मुलीवर कुकर्म करणाऱ्या प्रमुख आरोपींना सोमवारी उशिरा सायंकाळी अटक करण्यात आली.

अकोला : टिळक रोडवरील त्रिवेणीश्वर कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावर दहा वर्षीय मुलीवर कुकर्म करणाऱ्या प्रमुख आरोपींना सोमवारी उशिरा सायंकाळी अटक करण्यात आली; परंतु पोलिसांनी आरोपींची नाव सांगण्यास नकार दिला असून, मंगळवारी आरोपींची नावे जाहीर करू, असे स्पष्ट केले. शनिवारी जुने शहरातील एका दहा वर्षीय मुलीला पैशांचे आमिष दाखवून टिळक रोडवरील त्रिवेणीश्वर कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावर नेले. येथील निर्जनस्थळी तिच्यावर नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला. मुलीचे रक्ताने माखलेले कपडे पाहून येथील व्यापाऱ्यांच्या तिच्यावर अत्याचार झाल्याची बाब लक्षात आली. रामदासपेठ पोलिसांनी सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरोपींची धरपकड सुरू केली. संशयितांना ताब्यात घेत, त्यांची चौकशी सुरू केल्यानंतर पोलिसांनी प्रवीण चव्हाण यास अटक केली. त्यास न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी वृद्ध भिकारी गोविंद साखरे याला अटक केली. दरम्यान, पोलिसांच्या तपासाने अचानक दिशा बदलल्यानंतर महत्त्वाचे पुरावे सापडले. त्यानंतर पोलिसांनी तीन युवकांना ताब्यात घेतले. त्यापैकी दोन युवक हे लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन्ही युवकांची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर त्यांनी आरोपींबाबत माहिती देण्यास नकार दिला असून, योग्यवेळी आरोपींची नावे स्पष्ट करू, असे सांगितले.