शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

विद्यार्थिनींना अश्लील मॅसेज;शिक्षकास चोप!

By admin | Published: April 04, 2017 1:22 AM

पालकांनी केली शाळेत शिरून मारहाण

पातूर: विद्यार्थिनींना अश्लील मॅसेज पाठविणाऱ्या एका शिक्षकास १००ते १५० पालकांनी शाळेत जाऊन चांगलाच चोप दिल्याची घटना सस्ती येथील एका विद्यालयात ३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता घडली. या घटनेमुळे तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्राचार्यांच्या कक्षात या शिक्षकाने आपल्या चुकीची कबुलीही दिली आहे. प्राप्त माहितीनुसार सस्ती येथील एका विद्यालयात एका शिक्षकाने काही विद्यार्थिनींना अश्लील मॅसेज पाठविले होते. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने लहान मुलींकडून मोठ्या मुलींना चिठ्ठी पाठवून आपला मोबाइल क्रमांक दिला. आई-वडील घरी नसताना घरी बोलावण्याचे त्याने चिठ्ठीमध्ये लिहिले होते. ही चिठ्ठी एका मुलीने पालकांना दाखविल्याने हा प्रकार उघड झाला. ही बाब त्यांनी इतर पालकांना सांगितल्याने जवळपास १०० ते १५० पालकांनी आज संबंधित शाळेवर धडक दिली. यावेळी पालकांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप दिला. प्राचार्यांच्या कक्षात या शिक्षकास पालकांनी खडसावून विचारले असता त्याने विद्यार्थिनींना मॅसेज पाठविल्याचे कबूल केले. अखेर त्याच्याकडून प्राचार्यांनी माफीनामा लिहून घेतला. आता संचालक मंडळ काय कारवाई करते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. मुलीचा विनयभंग करणाऱ्यास पोलीस कोठडीअकोला: जेतवन नगरातील दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी आॅटोचालकास खदान पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली.जेतवन नगरातील दहा वर्षाच्या मुलीला शेजारी राहणाऱ्या आॅटोचालकाने बळजबरीने स्वत:च्या घरी उचलून नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्याच्या बेतात असतानाच तिने आरडाओरड करीत आॅटोचालकाच्या घरातून पळ काढला. दरम्यान, मुलगी घरी नसल्याचे पाहून त्या मुलीच्या आईनेही तिचा शोध सुरू केला होता. एवढ्यातच एका गल्लीतून सदर मुलगी रडत येत असल्याचे मुलीच्या आईला दिसले. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगताच त्या दोघीही प्रचंड घाबरल्या. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार खदान पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर पोलिसांनी आॅटोचालक शेख समीर शेख जमीर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला रविवारी सायंकाळी अटक केल्यानंतर सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली.