अकोला: अकोला पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी आर.व्ही. अंकुरकर हे सेवा निवृत्त झाल्याने यांच्या रिक्त जागी मनिषा शाह या रुजू झाल्या आहे. शाह या रत्नागिरी जिल्ह्यातून आलेल्या आहे. त्यांचे जि.प. कृषी सभापती वडाळ यांनी स्वागत केले.
भगवान रामदेवबाबा दुज उत्सव
अकोला: स्थानिक आळशी प्लाॅट येथील श्री रामदेवबाबा मंदिरात माघ सुदी दुज उत्सव साजरा करण्यात आला. शनिवार १३ फेब्रुवारी रोजी या उत्सवाच्या निमित्ताने सकाळी हवन, दुपारी व सायंकाळी आरती केली जाणार आहे. तसेच राजेश सोमानी यांच्या वाणीतुन स्तोत्र होणार आहे. तरी भाविकांनी उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुभाषचंद्र शर्मा यांनी केले आहे.
मेहरबानुचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत
अकोला: मेहरबानु महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. बीसीएमध्ये दक्षिता चाैबेनी चाैथी, राधिका टिकरानी आठवी, तर एश्वर्या कावडेने दहावे स्थान मिळविले आहे. तर बीबीए मध्ये राैनक लाहोटी पाचवा आणि तुलसी ज्ञानचंदानी हिने सहावे स्थान मिळविले आहे.
बेघरांना ब्लॅकेटचे वाटप
अकोला: निर्भय बनो जन आंदोलन, गायत्री परिवार व मंगेश काळे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बेघर नागरिकांना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. सोबतच मलाकापूर परिसरातील गरजवंतानाही ब्लॅकेट वाटप करण्यात आले.
अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
अकोला: सर्वोपचार रुग्णालय परिसरात सोमवारी रात्री अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. या संदर्भात वाॅर्ड बाॅय राहुल दामोधर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
सूर्यनमस्कार साखळी उपासना
अकोला: सूर्यनमस्कार दिनानिमित्त १९ फेब्रुवारी रोजी सूर्यनमस्कार साखळी उपासनाचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे. २४ तास चालणारी ही उपासना योग, व्यायाम आणि संस्कृतीच्या प्रचार प्रसारासाठी असल्याचे संयोजक धनंजय भगत यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
मूक व कर्णबधिर वर-वधूचा आदर्श विवाह
अकोला: भारतीय बाैद्ध महासभेच्यावतीने मूक व कर्णबधिर वर-वधूचा आदर्श विवाह ११ फेब्रुवारी रोजी पार पडला. अकोट तालुक्यातील वरुड जऊळका येथील प्रफुल्ल घनबहाद्दुर आणि अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथील किरण भोगे या दोन्ही मूक आणि कर्णबधिर जोडप्याचा विवाह वंचितचे नेते डाॅ. सुनील शिराळे यांच्या मार्गदर्शनात पार पडला. यावेळी गुणवंत सिरसाट, गाैतम ओहे, शांतीलाल गवई, विशाल वानखडे, मुन्ना धांडे आदी उपस्थित होते. फोटो आहे.......