बार्शिटाकळी : अडीच वर्षापूर्वी बार्शिटाकळी नगरपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी काँग्रेस उमेदवार निवडून आले होते; मात्र उपाध्यक्ष पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, भारतीय जनता पार्टी व अपक्षांनी एकत्र येऊन युती करीत न.प.च्या उपाध्यक्षपदी सुरेश सुखदेव जामनिक यांना विजयी केले.
नगर पंचायत उपाध्यक्षपद मिळविण्यासाठी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील धाबेकर हे शहरात तळ ठोकून होते. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडी व भाजपा यांनी ईश्वरचिठ्ठी काढून व अपक्षांना सोबत घेऊन उमेदवार ठरविला. नगरपंचायत उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांनी नामांकन अर्ज भरले होते. वंचित बहुजन आघाडी, भाजपा व अपक्ष युतीचे सुरेश सुखदेव जामनिक, काँग्रेसकडून मीना बबन राऊत व भाजपाच्या जयश्री रमेश वाटमारे यांनी नामांकन अर्ज भरले होते. ऐनवेळी भाजपाच्या जयश्री रमेश वाटमारे यांनी माघार घेतल्याने सुरेश सुखदेव जामनिक व मीना बबन राऊत यांच्यात लढत झाली. वंचित बहुजन आघाडी, भाजपा व अपक्ष युतीचे उमेदवार सुरेश सुखदेव जामनिक विजयी झाले. सुरेश जामनिक यांना ‘वंचित’चे सुनील सिरसाठ, कमला धुरंधर, नसीम खान, साबीया परवीन सै अब्रार, लाईका खातून सरफराज खान, भाजपाचे ॲड. विनोद राठोड, जयश्री रमेश वाटमारे, छाया राजेश साबळे, अपक्ष इफ्तेखारोद्दीन काजी सईदोद्दीन, अर्शद खान व स्वतः सुरेश जामनिक अशी अकरा मते पडली. काँग्रेसच्या उमेदवार मीना बबन राऊत यांना मेहफुज खान, हसन शहा, मनिषा बोबडे, नुसरत जमील, अ. अकील व स्वतः मीनाताई राऊत अशी ६ मते मिळाली. काँग्रसच्या नगरसेविका शबनम परविन शहा या गैरहजर होत्या. यावेळी पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष मेहफुज खान यांनी जाहीर केले. निवडणुकीसाठी मुख्यधिकारी स्नेहल राहाटे व प्रकाश हिरडकर यांनी सहकार्य केले. यावेळी इम्रान खान, रमेश वाटमारे, नईमोद्दीन भाई, चंदूशेठ, अन्सार खान, ॲड. जामनिक , गोबाशेठ, कदीर जमादार, शैलेश सिरसाट आदी उपस्थित होते. (फोटो)