- संजय उमक लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : बंद पडलेल्या शकुंतलेला कोणी वाली नसून, जनप्रतिनिधी उदासीन असल्याचे वृत ‘लोकमत’ने १७ सप्टेंबर रोजी प्रकाशित कले होते. ते वृत समाजमाध्यमांमध्ये जोरदार व्हायरल झाल्याने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी त्याची दखल घेऊन शकुंतला पुन्हा सुरू करण्याची मागणी २२ सप्टेंबर रोजी संसदेत केली. त्यावर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी शकुंतला लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.मेळघाटमधून अकोला-अकोट-धुळघाट रेल्वे-डाबका-देढतलाई-खंडवा जाणारा ब्रिटिशकालीन रेल्वे मार्ग परावर्तित करू नका व विदर्भातील श्रमजीवी - कष्टकरी, शेतकरी यांची जीवनवाहिनी असणारी शकुंतला रेल्वे कायम बंद करू नका, सद्यस्थितीत बंद असलेली शकुंतला लवकरात लवकर चालू करा, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी २२ सप्टेंबर रोजी लोकसभेत केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागणी केली असली तरी मेळघाट शकुंतलेला रेल्वे इतिहासातून गायब होऊ देणार नसल्याचे सांगत शकुंतला रेल्वे पुनर्जीवित करणार असून, ती लवकरात लवकर चालू करणार करणार असल्याचे अभिवचन केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिले असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. लोकसभेत खासदार नवनीत रवी राणा मेळघाट रेल्वे प्रश्नांवर आक्रमक झाल्या. पश्चिम विदर्भाची आन बान शान असणारी ब्रिटिश शकुंतला बंद झाल्याने मूर्तिजापूर-अचलपूर, मूर्तिजापूर यवतमाळ या मार्गावरील अनेक गावांतील लोकांना आता दळणवळण करताना कष्ट सहन करावे लागत आहे व त्यामुळे या भागातील व्यापार-उद्योग मंदावला असल्याने ही रेल्वे तत्काळ सुरू करावी, अशी मागणी केली.शकुंतला सुरू झाल्याने वरील मार्गावरील अनेक गावांना लाभ होणार आहे. म्हणून शकुंतला रेल्वे सुरू करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खासदार नवनीत राणा यांनी केले. त्याचबरोबर ब्रिटिशकालीन असणारी अकोला-अकोट-धुळघाट रेल्वे-डाबका-खंडवा मार्गावर धावणारी रेल्वे ब्रॉडगेज करण्यासाठी तात्पुरती बंद करण्यात आली; परंतु आता सदर रेल्वेचा मार्ग परावर्तित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र दिले, ज्यामुळे आदिवासींवर अन्याय होऊन ते मुख्य धारेतून बाहेर फेकल्या जाऊ शकतात व विकासापासून वंचित राहू शकतात.म्हणून हा मार्ग कुठल्याच परिस्थितीत बदलू नये व तातडीने ब्रॉडगेज करून या मार्गावरून रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी सभागृहात केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागणी केली असली तरी सदर मार्ग बदलणार नाही व ही रेल्वे जुन्याच मार्गाने धावेल व शकुंतला एक्स्प्रेससुद्धा लवकरच प्रारंभ करण्यात येईल, असे उत्तर केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी खासदार नवनीत रवी राणा यांच्या प्रश्नावर दिले.