सुनील काकडे /वाशिम : पश्चिम वर्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीनही जिल्ह्यांमध्ये हरितगृहांची (शेडनेट) अक्षरश: वाट लागली आहे. २0११ ते २0१५ या ४ वर्षाच्या काळात उभ्या झालेल्या उण्यापूर्या १८0 शेडनेटपैकी आजमितीस अध्र्यापेक्षा अधिक शेडनेट उध्वस्त झाल्याचे विदारक वास्तव आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असणार्या पश्चिम वर्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम या तीन्ही जिल्ह्यांकडे शासनाची पुर्वीपासूनच वक्रदृष्टी राहिलेली आहे. या भागातील शेतकर्यांना शेतीमधील अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत पुरेशी माहिती पुरविण्याकामी कृषी विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी आजही पारंपरिक पिकांच्या पेर्यातच गुरफटलेले आहेत. विपरित हवामानामुळे तीन्ही जिल्ह्यांमधील शेतकर्यांना दरवर्षी असमानी-सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाने कमी क्षेत्रात व प्रतिकुल परिस्थितीत शेतकर्यांना अधिक नफा मिळवून देण्यास सहाय्यभूत ठरणारे शेडनेट तंत्रज्ञान अंमलात आणले. यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून १0 गुंठे क्षेत्रावर ह्यशेडनेटह्ण उभारण्याकरिता १ लाख ३५ हजार रुपये; तर २0 गुंठे क्षेत्रासाठी २ लाख ४५ हजार रुपये अनुदानासह शेडनेटमध्ये भाजीपाला लागवडीकरिता १0 गुंठे क्षेत्रासाठी ३९ हजार आणि २0 गुंठे क्षेत्रासाठी ७0 हजार रुपये शासनाकडून आर्थिक सहाय्य दिल्या जाते. जवळपास एवढाच निधी खचरून शेतकर्यांना आपल्या शेतात शेडनेट उभारता येते. या माध्यमातून वाशिम जिल्ह्यात २0११ ते २0१५ या काळात ५५, बुलडाणा जिल्ह्यात ४६ आणि अकोला जिल्ह्यात ७९ असे १८0 शेडनेट उभारण्यात आले आहेत. प्रारंभीच्या काळात पश्चिम वर्हाडातील शेतकर्यांनी उत्सुकतेपोटी हे तंत्रज्ञान आत्मसात करुन शेडनेटमध्ये कोथिंबीर, काकडी, ढोबळी मिरची, सिमला मिरची, कारली यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड करुन समृद्धीकडे वाटचाल सुरु केली होती. मात्र, अवकाळी पाऊस, वादळी वारा यासह कृषी विभागाच्या योग्य मार्गदर्शनाअभावी तीन्ही जिल्ह्यांमधील १८0 पैकी अर्धेअधिक शेडनेट मोडून टाकण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्यातील एकट्या मंगरुळपीर तालुक्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून तब्बल ३६ शेडनेट उभारण्यात आले होते. आजरोजी त्यातील बोटावर मोजण्याइतपत अर्थात ६ ते ७ शेडनेट सुस्थितीत आढळून येतात. कमी-अधिक प्रमाणात इतर जिल्ह्यांमधील तालुक्यांचीही हीच गत झाली आहे. कृषी विभागाच्या अनास्थेमुळेच शासकीय अनुदानासोबतच शेतकर्यांनी शेडनेटसाठी ओतलेला पैसा व्यर्थ गेल्याची वस्तूस्थिती आहे.
*शेडनेटच्या अनुदानात वाढ
२0१४-१५ पर्यंत १0 गुंठे आणि २0 गुंठे क्षेत्रावर उभारल्या जाणार्या शेडनेटह्णकरिता अनुक्रमे १ लाख ३५ हजार रुपये आणि २ लाख ४५ हजार रुपये अनुदान दिल्या जायचे. त्यात २0१५-१६ या वर्षापासून वाढ करण्यात आली आहे. यापुढे शेतकर्यांना १0 गुंठे क्षेत्राकरिता २ लाख ५४ हजार रुपये; तर २0 गुंठे क्षेत्रावर शेडनेटकरिता ४ लाख ५0 हजार ५६0 रुपये अनुदान दिले जाणार आहे.