- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांचा १४२ वा प्रगटदिन महोत्सव शनिवारी भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. या उत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपºयातील १२४४ भजनी दिंडी सहभागी झाल्या.विदर्भ पंढरीत श्रध्देचा पाहुणचार घेतल्यानंतर या दिंडी आता आपल्या गावाकडे रवाना होत असून दिंडीत सहभागी झालेल्या तब्बल ५५ हजार वारकऱ्यांचा श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. श्री गजानन महाराज प्रगटदिन महोत्सवादरम्यान शेगावात दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत असल्याने भाविकांना विदर्भ पंढरीची ओढ असल्याचे दिसून येते.श्री गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवात राज्यातील १७ जिल्ह्यातील १२४४ भजनी दिंडी सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ११ जिल्ह्यातील २११ दिंडींतील वारकºयांनी पायदळ प्रवास केला. यामध्ये यवतमाळ ते शेगाव येथील एका दिडींने ११ दिवसांत ३१० किलोमीटरचा पायी प्रवास केला. तर त्यानंतर बीड-शेगाव, नांदेड-शेगाव, औरंगाबाद- शेगाव येथील दिंडीनी १० दिवसांत तर जळगाव ते शेगाव, जालना ते शेगाव, हिंगोली- शेगाव वाशिम-शेगाव येथील दिंडींनी पाच दिवस तर बुलडाणा ते शेगाव येथील दिंडीने चार दिवसांत तर अकोला ते शेगाव येथील दिंडीने दोन दिवसांचा पायी प्रवास करून शेगाव गाठले.भजनी दिंडी परतीच्या प्रवासाला!श्रींच्या प्रगटदिन महोत्सवाची सांगता रविवारी काल्याच्या किर्तनाने झाली. तत्पूर्वी शनिवारी सायंकाळी आणि रविवारी पहाटेच विदर्भ पंढरीत दाखल झालेल्या भजनी दिंडी परतीच्या प्रवासाला लागल्या होत्या. या दिंडीमध्ये आबालवृध्दांचा सहभाग दिसून येत होता.