अकोला : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे १७ वे राज्य अधिवेश औरंगाबाद येथे १ व २ आॅगस्ट २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील कर्नपुरा ग्राऊंड या ठिकाणी होणार असलेल्या या अधिवेशनात पुढील राजकीय वाटचालीत पक्षाची भूमिका निश्चित केली जाणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावर राजकीय, सामाजिक व आर्थिक आघाड्यांवर अनेक घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडींचा नेमका अर्थ आणि त्यासंदर्भात पक्षाच्या भूमिकेचे आकलन या अधिवेशनात होणार आहे. तसेच पुढील राजकीय वाटचालीत पक्षाची भूमिका या अधिवशेनात ठरणार असल्याचे चिटणीस मंडळ सदस्य भाई प्रदिप देशमुख यांनी सांगितले.या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ. सिताराम येचूरी आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांची उपस्थिती राहणार आहे. अकोला जिल्ह्यातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी या अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन चिटणीस मंडळ सदस्य भाई प्रदिप देशमुख व जिल्हा चिटणीस भाई दिनेश काठोके यांनी केले आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे राज्य अधिवेश १ आॅगस्ट रोजी औरंगाबादला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 3:01 PM
अकोला : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे १७ वे राज्य अधिवेश औरंगाबाद येथे १ व २ आॅगस्ट २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे या अधिवेशनात पुढील राजकीय वाटचालीत पक्षाची भूमिका निश्चित केली जाणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार उपस्थिती राहणार आहेत.