संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील शेवग्याच्या शेंगाचे उत्पादन चार पटीने वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ धोक्यात आली आहे. मागील वर्षांंच्या तुलनेत यंदा एक्सपोर्ट उठाव मिळाला नसल्याने शेतकर्यांना राज्यातच शेवग्याच्या शेंगा विकण्याची वेळ येत आहे. सर्वांत जास्त कॅल्शियमचे प्रमाण असलेल्या शेवग्याला आं तरराष्ट्रीय बाजारपेठेत भरपूर वाव असल्याने दोन वर्षांंपासून राज्यातून मोठय़ा प्रमाणात शेवग्याचे एक्सपोर्ट होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेवग्याला भाव मिळत असल्याने शेतकर्यांनी मोठय़ा प्रमाणात शेवग्याचे उत्पादन घेतले. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी निश्चित असल्याने आता या मालास उठाव नाही. त्यामुळे पाच रुपये किलोच्या भावानेदेखील ग्राहक राज्यात मिळेनासा झाला आहे. गुडघे दुखी, मणके दुखी, सांधे दुखी यासाठी शेवग्याच्या शेंगाची भाजी ही रामबाण उपाय आहे. मात्र, जिथे पिकते तिथे विकल्या जात नाही. पाच रुपये किलोने शेवग्याच्या शेंगा मिळत असल्या, तरी नाक मुरडल्या जात आहे. या शेंगांना भाव मिळत नसल्याने शेतकर्यांनी शेवग्यावर प्रक्रिया करणारा उद्योग टाकावा, त्याच्याशी संबंधित जोडधंदे करावे त. यासाठी शेवग्याचे सूप, सरबत करून बाजारात आणावे. शेवग्याची चटणी, पराठे, पापड तयार करावे, असेही जाणकारांचे मत आहे. शेवग्याचे महत्त्व विदेशींना कळले. जेव्हा त्याचे महत्त्व भारतीयांना कळेल, तेव्हा इस्राईलहून आपण १५0 ते २00 रुपये किलोच्या भावाने शेवग्याच्या शेंगा घेतल्याशिवाय राहणार नाही.
प्रवाळ व जनावरांच्या हाडांपेक्षा बरेहाडांची ढिसूळता, दातांचे विकार यासाठी वैद्यकीय मंडळी कॅल्शियमच्या औषधी लिहून देतात. या औषधांमध्ये समुद्रा तील प्रवाळ आणि जनावरांच्या हाडांचा समावेश असतो. त्यापेक्षा रुग्णांनी शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यास उच्च प्र तीचे थेट कॅल्शियम मिळू शकते. शेवग्याच्या शेंगामध्ये गांजराच्या १0 पट व्हिटॅमिन, दुधाच्या १७ पट कॅल्शियम मिळते. सोबतच केळीच्या १५ पट पोटॅशियम मिळते, पालकाच्या २५ पट लोह व दह्याच्या ९ पट प्रोटिन मिळते.-संदीप वाघाळकर, आहार तज्ज्ञ, अकोला.
मागील वर्षी शेवग्याला चांगला भाव मिळाल्याने, शेवग्याचे पीक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविण्याची तयारी मी यंदा केली होती. एक्सपोर्टला वाव नसल्याने हा माल अकोल्या तच विक्री करीत आहे. मात्र, त्याला फारशी किंमत मिळालेली नाही. शेवग्याचे महत्त्व अद्याप नागरिकांना कळलेले नाही.- नीलेश डहेनकार, शेतकरी अकोला.-