जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनामार्फत यात्रा महोत्सवावर बंदी घातली आहे. त्यानुषंगाने शिर्ला सोळा मैलातील हनुमान जयंतीनिमित्त भरणारी यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती विश्वस्त मंडळातर्फे पुजारी गजानन गवरे यांनी दिली आहे.
------------------------------------------------------
महागाव-मार्डी येथील यात्रा महोत्सव रद्द
रुईखेड : येथून जवळच असलेल्या महागाव-मार्डी शिवारातील भवानी देवी यात्रा महोत्सव चैत्र शुद्ध पौर्णिमेला दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. यंदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दि. २७ एप्रिल रोजी होणारा यात्रा महोत्सव शासनाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे. भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येथे निसर्गरम्य वातावरणात असलेल्या भवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. दरवर्षी येथे भाविक चैत्र पौर्णिमेला गर्दी करीत असतात. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात कोरोना बाधितांचा उद्रेक होत असताना अनेक दिवसापासून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. दैनंदिन देवीची पूजाअर्चा सुरेश महाराज भुमरे करीत असून, यात्रेनिमित्त होणारी महापूजा संस्थानचे विश्वस्त बाळासाहेब लोडम सपत्नीक करणार आहेत. यात्रेनिमित्त कोणत्याही भाविकांनी भवानी देवीच्या मंदिर परिसरात दर्शनाकरिता येऊ नये, असे आवाहन बाळासाहेब लोडम यांनी केले आहे.
फोटो