अकोला/पातूर : गाव नमुना आठ ‘अ’मध्ये घराची नोंदणी करण्याच्या मोबदल्यात एका महिलेकडे दोन हजारांची लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या शिर्ला ग्रामपंचायतचा लिपिका लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले. प्रमोद तुळशीराम उगले (३७) असे या लाचखोर कर्मचाºयाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.पातूर येथील रहिवासी असलेल्या महिला तक्रारदाराने ,आपले घर त्यांच्या मुलींच्या नावाने ग्रामपंचायत रेकॉर्डवर नोंद करण्यासाठी तक्रारदारला गेल्या महिन्याभरापासून विनंती करीत होती. मात्र लिपिक उगले महिलेचे घर मुलीच्या नावाने करण्यासाठी टाळाटाळ करीत होता.शेवटी तक्रारदाराने घराची नोंद करण्यासाठी काय करावे लागेल, अशी विचारणा केल्यावर,लिपिक प्रमोद उगले याने २०००हजार रुपयांची लाच मागितली होती. सदर तक्रारदाराला लाचेची रक्कम द्यायची नसल्याने, तशी तक्रार अकोलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.त्यावरून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबी तपासून, लिपिक प्रमोद उगले याने २०००हजार रुपयांची लाच मागितली असल्याची खात्री झाल्याने,शिरला ग्रामपंचायत च्या हद्दीत सापळा रचून, प्रमोद उगलेला दोन हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक केली, त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून,उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी दिली आहे.ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय गोरले,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार,पोलीस कॉन्स्टेबल गजानन दामोदर, पो.काँ.लता वानखेडे,सुनील राऊत,राहुल इंगळे,सुनील येलोने,सचिन धात्रक,चालक प्रवीण कश्यप यांनी केली.