शिरपूर-पिंपळखुटा मार्गावरील शिरपूर येथे सिंगल फेजच्या रोहित्राची थातुरमातुर दुरुस्ती केल्याने, वारंवार जळून वीजपुरवठा खंडित होत आहे, तसेच रोहित्र जळाल्याने गेल्या तीन दिवसांपासून गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे गाव अंधारात आहे. गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला असून, पीठ गिरण्या बंद पडल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. शेजारी असलेल्या गावातून दळण व पाणी आणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने, गावात जागोजागी घाणीचे साम्राज्य असल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. अशातच अंधारात रात्र काढावी लागत आहे. संबंधित वरिष्ठांनी त्वरित दखल घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
शिरपूर येथे तीन दिवसांपासून रोहित्र जळाल्याने गाव अंधारात आहे. गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नदीतील दूषित पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. परिणामी, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
- मोहम्मद आसिम, ग्रामस्थ, शिरपूर.
ग्रामस्थांना पिण्यासाठी दूषित पाणी
तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नदीतील दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब लक्षात घेता, त्वरित वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
अभियंत्यांकडून दखल नाही!
याबाबत ग्रामस्थांनी संबंधित उपकेंद्राच्या कनिष्ठ अभियंता यांच्याशी वारंवार संपर्क साधून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली, परंतु कनिष्ठ अभियंता यांच्याकडून अद्यापही दखल घेण्यात आली नाही. परिणामी, गेल्या तीन दिवसांपासून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
यापूर्वी घडल्या चोरीच्या घटना
वीजपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे सर्पदंश, तसेच चोरीची घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही गेल्या काही महिन्यांआधी वीजपुरवठा खंडित असल्यामुळे अनेक चोरीच्या घटना घडल्या होत्या.
180921\img20210722164021.jpg
फोटो