लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आगामी जिल्हा परिषद तसेच विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन शिवसेना नेते, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शिवसैनिकांना केले. पक्षाच्या आढावा बैठकीत उपस्थित शिवसैनिकांना त्यांनी मार्गदर्शन केले. वर्षभराच्या कालावधीनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक होणार असून, त्यानंतर लगेच विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुका लक्षात घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुषंगाने ना.दिवाकर रावते शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी अकोल्यात दाखल झाले होते. स्थानिक हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत त्यांनी शिवसेना पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यात गावोगावी शाखा उघडून शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन ना.रावते यांनी यावेळी केले. याप्रसंगी सहायक संपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, माजी आ.संजय गावंडे, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, दिलीप बोचे, महादेवराव गवळे, महिला संघटिका ज्योत्स्ना चोरे, शहरप्रमुख अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, तालुकाप्रमुख विकास पागृत, विजय माहोड, संजय शेळके, अ प्पू तिडके, गजानन मानतकर, रवी मुर्तडकर आदी उपस्थित हो ते.
महिला पदाधिकार्यांची अनुपस्थिती!शिवसेनेच्या आढावा बैठकीला महिला संघटिका ज्योत्स्ना चोरे वगळता संघटनेच्या सर्व महिला पदाधिकार्यांनी पाठ फिरवल्याचे यावेळी समोर आले. ही बाब ध्यानात घेऊन ना.रावते यांनी महिला संघटनेचा आढावा घेण्याचे टाळले असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.
बंदद्वार घेतला आढावाना.दिवाकर रावते यांनी जिल्हा कार्यकारिणीचा बंदद्वार आढावा घेतला. संबंधित उपजिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख यांच्याकडून पक्षाच्या कामकाजाची माहिती घेण्यात आली. यावेळी श्रीरंग िपंजरकर, नितीन देशमुख, ज्योत्स्ना चोरे उपस्थित होते.