अकोला : शिवसंग्राम संघटना येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका लढणार असल्याची माहिती शिवसंग्राम युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा व शिवसेनेसोबत शिवसंग्राम सहभागी आहे; मात्र येणाºया काळातील निवडणुकांच्या जागा वाटपासंदर्भात लवकरच वरिष्ठ स्तरावर एक बैठक होणार आहे. यामध्ये शिवसंग्राम विधानसभेसाठी राज्यातील १५ मतदारसंघात तयारी करीत असून, या १५ ठिकाणच्या जागा मागणार आहे. यासोबतच अकोला लोकसभा मतदारसंघातही शिवसंग्राम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसंग्राम उमेदवारांना रिंगणात उभे करणार असल्याची माहिती शिवसंग्राम युवकचे प्रदेशाध्यक्ष आहेर यांनी दिली. शिवसंग्राम शेतकºयांच्या मागण्यांसाठी आंदोलन छेडणार असून, यामध्ये शेतकºयांच्या मुलांना शेतीवर शेती गहाण ठेवून उद्योगासाठी कर्ज देण्याची मागणी करणार आहे. ज्याप्रमाणे शहरातील घर किंवा प्लॉटवर बँक कर्ज देतात, त्याचप्रमाणे शेतकºयांच्या शेतीवर उद्योग उभारण्यासाठी कर्ज देण्याची मागणी रेटून धरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेती गहाण ठेवून दिलेले कर्ज माफ करण्यात येऊ नये, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासोबतच जिल्हा स्तरावर बेरोजगार युवकांसाठी शिवसंग्राम रोजगार मेळावे घेणार असून, या माध्यमातून ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न होणार आहे. शासनाने आउटसोर्सिंगच्या माध्यमातून बºयाच नोकºया उपलब्ध करून दिल्या आहेत; मात्र या नोकºयांची माहिती बेरोजगारांना मिळत नसल्याने त्यांच्यासाठी शिवसंग्राम एक वेबसाइट लाँच करणार आहे. या पत्रकार परिषदेला शिवसंग्रामचे संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष अक्षय झटाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.