अकाेला: पेट्राेल,डिजेल व घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे माेडल्याचा आराेप करीत शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात साेमवारी गाढवावरुन केंद्रीय पेट्राेलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिकात्मक धिंड काढण्यात आली. खुले नाट्यगृहापासून गांधी चाैकापर्यंत बैलगाडीत दुचाकी आणन्यात आल्या. यावेळी केंद्र शासनाविराेधात जाेरदार घाेषणाबाजी करण्यात आली.
इंधनाचे दर वाढल्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर झाल्यामुळे शहर शिवसेनेच्यावतीने केंद्र शासनाच्या विराेधात आंदाेलनाचा बिगुल फुंकण्यात आला. आंदाेलनाच्या चाैथ्या दिवशी उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकार, बंडू सवाइ, देविदास बोदडे, मुन्ना मिश्रा, संतोष रणपिसे, अनिल शुक्ला, राजाभाऊ गाढे, कुणाल शिंदे, राजू वगारे, प्रमोद धर्माळे, राजू मिसे , अक्षय नागपुरे, स्वप्नील अहिर, अमोल खडसान, शुभम इंगळे, राजेश कानपूरे, आशु तिवारी, बाळू चव्हाण, संतोष भालेराव, उमेश टेकाड़े, अनिल परचुरे, पंकज बाजोळ, निखिल धनबर, अभि खेळकर, राजेश सावळे, मोहित बुंदेले,राजेश सूर्यवंशी ,ओम जोध, अक्षय वानखडे, निखिल ताकवाले, निखिल ठाकूर, ओम वानखडे, तुषार ढवळे , निलेश भोसले, संतोष आखरे, भगवान वानखडे, दशरथ मिश्रा, भोला जाधव, गजू जाधव, भूषण बरडीया, गणेश बरडीया सोनू बरडीया, विनोद ढोले आदिंसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. आंदाेलनाचे आयाेजन नगरसेवक गजानन चव्हाण , विभाग प्रमुख राजेश इंगळे, देवा गावंडे, मनीष भोबळे ,गोपाल लव्हाळे, गणेश बुंदेले ,सुरेश इंगळे यांनी केले होते.