अकोला, दि. 0४- आजपर्यंंंत एकमेकांच्या मदतीने निवडणुकीला सामोरे जाणार्या शिवसेना, भाजपची महापालिकेसाठी युती तुटताच राजकीय समीकरणांमध्ये घडामोडी सुरू झाल्या. केंद्र व राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजप मोठय़ा भूमिकेत वावरू लागला. अशा स्थितीत महापालिकेच्या आखाड्यात शिवसेनेने ७३ जागा लढवण्याचा निर्णय घेतला, तर योगायोगाने भाजपनेदेखील ७३ जागांवर उमेदवार उभे केले. त्यामुळे मनपाच्या निवडणुकीत नेमक ा कोणता पक्ष बाजी मारतो, याकडे सर्वांंंचेच लक्ष लागले आहे. राज्यात पार पडलेल्या २0१४ मधील विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचे बिनसले, ते अद्यापही कायम आहे. दोन्ही पक्ष सत्तेची फळं चाखत असतानाच शिवसेनेकडून मित्र पक्षावर शाब्दिक हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली जात नाही. भाजपकडूनदेखील सेनेला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जात असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांमधील ही खदखद नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत समोर आली.निवडणूक रिंगणातील इच्छुक उमेदवारांना ह्यएबी फॉर्मह्णचे वाटप झाल्यानंतर युतीच्या निर्णयावर चर्चा झडू लागल्या. शेवटी नगरपालिका निवडणुकीत युती न करताच दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढणे पसंत केले. ही परिस्थिती राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीत कायम राहील का,असा कयास बांधला जात असतानाच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारी रोजी मनपा निवडणुकीसाठी भाजपसोबतची युती तुटल्याचे जाहीर करून यापुढे राज्यातील राजकारणाची दिशा बदलणार असल्याचे संकेत दिले. युती तुटल्याचा सर्वाधिक आनंद दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांंंनाच अधिक झाल्याचे दिसून आले. निवडणुकीतून उमेदवारीचा पत्ता कट होईल, या धास्तीने युती तुटल्याचे समाधान व्यक्त होऊ लागले. त्या दिशेने दोन्ही पक्षांनी वाटचाल सुरू केली. मनपाच्या ८0 जागांसाठी सेना-भाजपने प्रत्येकी ७३-७३ उमेदवारांच्या तिकिटावर शिक्कामोर्तब केले आहे. यापैकी दोन्ही पक्ष किती जागांवर विजयी होतात, हे मतदार राजावर अवलंबून आहे, हे तेवढेच खरे. आक्रमक होण्याचे निर्देशमहापालिकेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान आक्रमक बाणा जोपासण्याचा कानमंत्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी दोन्ही पक्ष पहिल्यांदाच स्वबळावर लढत असल्यामुळे पक्षाची ताकद सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ असण्याच्या मुद्यावर सेनेत रणनिती आखल्या जात आहे.
निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना-भाजप समान
By admin | Published: February 04, 2017 2:23 AM