पातूर : शिवसेना जातपात मानणारा पक्ष नसून, सर्वांना सोबत घेऊन काम करीत आहे. आगामी नगर परिषद निवडणुकीत शिवसेना पक्ष हा सर्वच १७ जागी उमेदवार देऊन निवडणूक लढणार असल्याचे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले. पक्षबांधणी आणि आगामी नगर परिषद निवडणूक तयारीसंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी शुक्रवार, दि.३ सप्टेंबर रोजी शहरातील श्री सिदाजी महाराज संस्थान येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार नितीन देशमुख बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश शिरवाडकर यांची उपस्थिती होती. बैठकीत प्रकाश शिरवाडकर यांनी मुस्लीम बांधवांच्या उद्धारासाठी शिवसेना सदैव तत्पर असल्याचे सांगितले. आढावा बैठकीला उमेशअप्पा भुसारी, गजानन पोपळघट, जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शहरप्रमुख अजय ढोणे, तालुकाप्रमुख रवी मुर्तडकर, उपशहरप्रमुख शंकर देशमुख, निरंजन बंड, रामाभाऊ शेगोकार, सुनील गाडगे, परशराम उंबरकार, शफिक उल्ला खान, पंचायत समिती सदस्य गोपाल ढोरे, ॲड. सुरत झडपे, डॉ. विजय दुतोंडे, गजानन पोपळघट, डॉ. दिगंबर खुरसाळे, अरुण कचाले, सुभाष धनोकार, नितीन मानकर, पंजाब पवार, छोटू काळपांडे, महेंद्र ढोणे, अंबादास देवकर, नंदू येनकर, सागर रामेकर, योगेश फुलारी, संतोष राऊत, सुनील माउलीकर, सुनील गावंडे, सुभाष राखुंडे, अमोल लांडगे, दीपक देवकर, कैलास बगाडे, देवलाल डाकोरे, अनिल निमकंडे, संतोष घुगे, विशाल गोतरकार, अरविंद माकोडे, पिनू करंगळी, बंडू देवकर, किशोर बोंबटकार, सचिन फुलारी, प्रमोद हाडके, विजय ढोणे, विजय हिराळकर, सुनील तांबटकर, संदीप गिरी, अण्णा पाटील, सुधाकर शिंदे, बंडू वानखडे, आनंदा तायडे, विश्वनाथ इंगळे, पवन ढोणे, गणेश बुलबुले आदी उपस्थित होते.