विजय मोहोड गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे काम केले. सर्वांना सोबत घेऊन त्यांनी शिवसेनेची संघटनात्मक बांधणी केली. पंचगव्हाण सर्कलमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविला. पंचगव्हाण सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले. शिवसेना तालुका प्रमुख म्हणून काम करताना, त्यांनी शांत संयमी व प्रगल्भ नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केली. त्यांच्या अचानक जाण्यामुळे शिवसेनेमध्ये पोकळी निर्माण झाली. त्यांनी राजकारणातूनही समाजकारण केलं. सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्याचा ठसा उमटविला. विजय मोहोड यांनी अकोला येथील दवाखान्यामध्ये भरती होण्यापूर्वी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी दौराही केला होता. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, आई, भाऊ असा आप्तपरिवार आहे. विजय मोहोड यांच्या पार्थिवावर अकोला येथे नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जिल्हा परिषद गटनेते गोपाल दातकर, जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ, शिवसेना अकोला तालुका प्रमुख विकास पागृत, संजय भांबरे, ज्ञानेश्वर आखरे, राजेश पाचपोर उपस्थित होते.
फोटो: ईएमएस