अकोट : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसैनिकांनो मनाने खचून जाऊ नका, योग्य नियोजन करा, यश निश्चित मिळेल, असा आशावाद व्यक्त करीत आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा येथे शाखाप्रमुख व बूथप्रमुख यांच्या मेळाव्यात जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी केली.
यावेळी जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख प्रकाश शिरवाडकर, माजी आमदार संजय गावंडे, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका माया म्हैसणे, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, तालुकाप्रमुख श्याम गावंडे, शहर प्रमुख सुनील रंदे, शिवसेनेचे गटनेते मनीष कराळे, विजय दुतोंडे, विक्रम जायले, उपजिल्हा संघटक, युवासेना विस्तारक राहुल कराळे, अतुल म्हैसणे, तालुका संघटक रोशन पर्वतकर, शहर संघटक कमल वर्मा, अंभीर मोरे, प्रशांत अढाऊ, नगरसेविका विजया बोचे, नगरसेविका जयश्री बोराडे, उषा गिरनाळे, हर्षदा जायले, लक्ष्मी सारिशे, सरपंच जगन निचळ, सरपंच अवी गावंडे, सुभाष सुरतने, विजय भारसाकळे, राजेंद्र मोरे, राधेश्याम जामुनकर, मुरलीधर खोटे, ज्ञानेश्वर ढोले, धीरज गावंडे, कुणाल कुलट, अक्षय घायल, दिलीप लेलेकर, गोपाल म्हैसणे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रकाश शिरवाडकर, संजय गावंडे, माया म्हैसणे, गोपाल दातकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. प्रास्ताविकात शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी आढावा सादर करीत नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणुकीसाठी पक्षाची सर्व तयारी झाल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन विजय ढेपे, आभार श्याम गावंडे यांनी मानले.