अकोट शहरातील रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. दोन वर्षांपासून सांडपाणी साचले आहे. याबाबत नगरसेवक गटनेते मनीष कराळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनास वारंवार निवेदने, पत्र दिले होते. अखेर ३० डिसेंबर रोजी माजी आमदार संजय गावंडे तसेच शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक माया म्हैसने यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना गटनेते मनीष कराळे यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तसेच नागरिकांसह चिखल बैठो आंदोलन केले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख सुनील रंधे, शहर संघटक रोशन पर्वतकर,माजी उपशहर प्रमुख विजय ढेपे,उपशहर प्रमुख गणेश चंडालिया,दीपक रेखाते,लखन अंभोरे,श्रीजित कराळे,नंदू कुलट,नितीन काकड,गोवर्धन आवारे, मनीष काका कराळे,अंकुश कुलट,अक्षय घायल,संतोष तायडे,विशाल कोडापे,तेजा पालेकर, धनराज गावंडे,संतोष तायडे,रितेश उजिडे, प्रफुल्ल गुप्ता,अंकुश बोचे,ज्ञानेश्वर मानकर,गोविंद चावरे,शुभम सोळंके,अभि जोशी,सागर कराळे,राजू येरोकर,रोहित अंभोरे,राजू सोळंके,प्रवीण वसू,मदन आंबेकर,ज्ञानेश्वर मुंडे,प्रभू मेंढे,विशाल चंदन,संजय सोपरकर,निलेश मोगरे,विठ्ठल रेळे,नरेश सभागचंदानी, ज्ञानेश्वर ओलंबे यांच्यासह शहरातील शेकडो नागरिकांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
अकोटात शिवसेनेचे रस्त्यावर ‘चिखल बैठो’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:19 AM