शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
2
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
3
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
4
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
6
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
7
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
8
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
10
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
11
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
12
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
13
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
14
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
15
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
17
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
18
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
19
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
20
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

१३६ कोटींतून होणार शिवणी ते जुना बाळापूर नाक्यापर्यंत सिमेंट रस्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 2:45 PM

१३६ कोटी रुपयांतून निर्माण होणाºया या रस्त्याचा कार्यादेश (नियुक्ती आदेश) लवकरच जारी केला जाणार आहे.

 - आशिष गावंडेअकोला: केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी चार वर्षांपूर्वी घोषणा केलेल्या बहुप्रतीक्षित शिवणी-शिवरपासून ते धाबेकर फार्म हाउसजवळील जुना बाळापूर नाक्यापर्यंत सिमेंट रस्त्याच्या निविदेला अखेर उशिरा का होईना, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (एनएचएआय) मंजुरी दिली आहे. १३६ कोटी रुपयांतून निर्माण होणाºया या रस्त्याचा कार्यादेश (नियुक्ती आदेश) लवकरच जारी केला जाणार आहे.तत्कालीन नगर परिषदेच्या कालावधीत अकोला शहरात अतिशय नियोजनपूर्वक विकास कामे करण्यात आली होती. प्रशस्त सिमेंट व डांबरी रस्ते, पथदिवे, लहान मुलांच्या करमणुकीसाठी विविध भागातील उद्याने, नाल्या-गटारांची सुविधा उपलब्ध होती. या विकास कामांचा अभ्यास करण्यासाठी अनेक शहरातील राजकीय नेते, पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी शहराला भेट देत होते. त्यानंतर मात्र राजकीय पटलावर उदय झालेल्या विविध राजकीय पक्षांतील नेत्यांकडे दूरदृष्टी व धोरणात्मक बाबींचा अभाव असल्याने विकास कामांच्या बाबतीत शहर कमालीचे माघारले. अमरावती शहरातील विकास कामांच्या तुलनेत अकोला शहर पीछाडीवर असल्याचे चित्र आहे. राज्यात व केंद्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर २०१५ मध्ये केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी ‘एमआयडीसी’ मार्गावरील अप्पू पॉइंट चौकात शहरासाठी उड्डाणपूल, दोन सिमेंट रस्त्यांसाठी निधीची घोषणा केली होती. ही घोषणा चार वर्षांनंतर प्रत्यक्षात उतरली असून, उड्डाणपूल निर्मितीच्या हालचालीनंतर आता शिवणी-शिवरपासून ते धाबेकर फार्म हाउसजवळील जुना बाळापूर नाक्यापर्यंत चौपदरी सिमेंट रस्त्याच्या निविदेला ‘एनएचएआय’ने मंजुरी दिली आहे. रस्त्याचा कंत्राट औरंगाबाद येथील जी.एन. इन्फ्रा कंपनीला देण्यात आला आहे.धिंग्रा चौक ते जयहिंद चौक रस्त्याची प्रतीक्षाअशोक वाटिका ते धिंग्रा चौक ते जयहिंद चौक तसेच किल्ला चौक ते थेट जुना बाळापूर नाक्यापर्यंत चौपदरी सिमेंट रस्ता होईल. गांधी चौकापासून ते किल्ला चौकापर्यंत या रस्त्याची रुंदी कमी होणार असल्यामुळे या कामाला अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याची माहिती आहे....तरीही ‘एनएचएआय’ने जबाबदारी स्वीकारली!बहुतांश वेळा शहरातून जाणाºया जुन्या महामार्गांच्या दुरुस्तीची कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमार्फत केली जात नाहीत. या बाबीला अकोला शहर अपवाद असून, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे ‘एनएचएआय’ने अंतर्गत रस्ता तयार करण्याची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती आहे.

खर्च ‘एनएचएआय’ देणार नाही!शहरातून जाणाऱ्या या जुन्या महामार्गाच्या बाजूला भूमिगत वीज वाहिनी, खासगी कंपन्यांचे केबल टाकण्यासाठी निर्माण केल्या जाणाºया सुविधेचा खर्च ‘एनएचएआय’ करणार नसून, हा भार राज्य शासनाने उचलावा, अशी अट करारनाम्यात नमूद आहे. या अटीवरच १३६ कोटींची निविदा मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. ‘एनएचएआय’च्या स्तरावर करारनाम्याला मंजुरी मिळाल्यानंतर कंपनीला नियुक्ती आदेश दिला जाईल.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका