अकाेला: घरगुती गॅस सिलींडरच्या दरात पुन्हा वाढ झाली असून केंद्र शासन इंधनाचे दर कमी करीत नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याचा आराेप करीत शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात गुरुवारी तुकाराम चाैकात केंद्र शासनाच्या विराेधात उग्र आंदाेलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय पेट्राेलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पुतळा जाळून गॅस सिलींडर व खाद्यतेलाचे डबे फासावर चढवित केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
पेट्राेल,डिजेलच्या दरवाढीविराेधात शिवसेनेने सलग सातव्या दिवशी आंदाेलन छेडत निषेध व्यक्त केला. तुकाराम चाैकात सेनेचे नगरसेवक मंगेश काळे, उपशहर प्रमुख केदार खरे, राजू वगारे, प्रमाेद धर्माळे, विकास शिंदे, सतिष मदनकार, सतिष डांगे, विजय दुर्याेधन, विनाेद थुकेकर, मनाेज राउत,सुयाेग देशमुख, पप्पू चाैधरी, उदय नवले, जनामामा, प्रथमेश जयस्वाल, अजिंक्य वाघमारे, आदित्य इंगळे, शुभम तळाेकार, राेहन काळे, साैरभ गावंडे,गाैरव धामेद्र, ऋषीकेश गवइ, सुरज कांबळे, यश जीने, ओम मेहरकर, ऋतूज वगारे, गाैरव शिंदे, गणेश भटकर, अभि शिंदे, निजर बघारे, तुषार देशमुख यांनी आंदाेलनाचे आयाेजन केले हाेते. यावेळी नम्रता धर्माळे, राखी पेठेकर, रुख्मीणी जाधव, अनिता शर्मा, अपर्णा पाटील, लता कवर, वर्षा जाेशी, शारदा आमले, सीमा माेकळकर, नंदा गाडे, रजनी तायडे, अविनाश माेरे, शैलेश अंदूरेकर, गणेश पाेलाखडे यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित हाेते.