अकोले येथे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि माजी सहकारमंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची गळाभेट झाल्याने इंदापूर तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. (sanjay raut meet harshvarshan patil in akola)
रविवारी अकोले (ता.इंदापूर) येथे खासदार संजय राऊत एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले होते. या निमित्ताने पाटील आणि राऊत या दोघांची गळाभेट झाल्याने लोकांमध्ये राजकीय उलथापालथ होतेय की काय अशी चर्चा लोकांमध्ये रंगू लागली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाऊन त्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. यात त्यांचा पराभव झाला होता. या नंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची हर्षवर्धन पाटील यांनी गळाभेट घेतल्याने राजकीय चर्चा जोर धरू लागली आहे. या भेटीवर हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्टीकरण देत या भेटीमध्ये कोणताही राजकीय उद्देश नसून तालुक्यात आलेल्या पाहुण्यांची गळाभेट घेऊन स्वागत करणे ही परंपरा असल्याने यात कोणतेही तथ्य नसल्याचे पाटील यांनी नमूद केले.
....तर लॉकडॉउन लावावा लागेलखासदार संजय राऊत रविवारी इंदापूर तालुक्यात येत असल्याने आमचे मैत्रीचे संबंध असल्याने या निमित्ताने भेट घेण्यात आली. या बाबत खासदार संजय राऊत म्हणाले, राज्यात कोरोना रोगाचे संकट वाढत असून याला आला अटकाव करण्याची जबाबदारी सरकार बरोबर सर्व नागरिकांची पण आहे. यात राजकारण करून काही उपयोग होणार नाही. ग्रामीण भागात लोक शिस्त पाळताना दिसत नाही. जर रुग्णांची संख्या जर वेगाने वाढली तर प्रशासनाला पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल असे संकेत राऊत यांनी यावेळी दिले.