अकोला: ऐन नवरात्र उत्सवाच्या पृष्ठभूमीवर महावितरण कंपनीने सुरू केलेले भारनियमन त्वरित बंद करण्याची मागणी करीत आक्रमक झालेले शिवसैनिक मंगळवारी महावितरण कार्यालयावर धडकले. वीज चोरीला आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या महावितरणने हिंदू धर्मीयांच्या सणासुदीच्या काळातील भारनियमन बंद न केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड इशारा शिवसेना शहर प्रमुख (अकोला पश्चिम) राजेश मिश्रा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला.हिंदू धर्मीयांच्या सणासुदीची रेलचेल सुरू झाली आहे. सर्वाधिक पवित्र मानल्या जाणाºया नवरात्र उत्सवाच्या तोंडावर महावितरण कंपनीने जुने शहरात भारनियमनाचे हत्यार उपसले. यासंदर्भात जुने शहरवासीयांना कोणतीही पूर्वकल्पना न देता भारनियमन करण्यात आले. शहरातील काही विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जाते. त्याचा अधिभार इतर सर्वसामान्य अकोलेकरांना जमा करावा लागतो. या सर्व बाबींची माहिती असूनही वीज चोरीला आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या महावितरण कंपनीने सणासुदीच्या काळातील भारनियमन बंद करण्याची मागणी करीत शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिकांनी महावितरण क ार्यालयावर धडक दिली. यावेळी अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांना निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका मंजूषा शेळके, नगरसेवक गजानन चव्हाण, शशी चोपडे, संघटक तरुण बगेरे, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, मा. नगरसेवक शरद तुरकर, विक्की ठाकूर, अविनाश वानखडे, प्रमोद मराठे, आकाश मुद्गल, विनोद मोरे, आरती वरडे, सोनल देशपांडे, योगिता सांचेला, करुणा चुटके, सीमा गावंडे, मनोज बाविस्कार, अक्षय कुळकर्णी, मुकेश तायडे आदी उपस्थित होते.