अकोला : अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन रस्त्याच्या कामाची लक्तरे अवघ्या तीन महिन्यांत वेशीवर टांगल्या गेली आहेत. यासोबतच नेकलेस रस्ता व इतर सिमेंट रस्त्यांची पोलखोल झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये उमटल्यानंतर सोमवारी विविध राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले. अशोक वाटिका रस्त्यासाठी शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांच्या कार्यालयात ठिय्या दिला, तर मनपाचे विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांच्या नेतृत्वात नेकलेस रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये ‘झाडे लावा’ आंदोलन छेडण्यात आले होते.शहरातील सर्वात मुख्य रस्ता असणाऱ्या अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन चौक रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सीआर कन्स्ट्रक्शन कं पनीने एप्रिल महिन्यात या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण केले होते. कामाचा दर्जा अतिशय सुमार आणि प्रशासकीय यंत्रणेला लाजवणारा असल्यामुळेच जुलै महिन्यात हा रस्ता पावसाच्या पाण्यात चक्क वाहून गेल्याचे चित्र समोर आले आहे. या प्रकरणी सोमवारी शिवसेनेचे शहर प्रमुख (अकोला पश्चिम) राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात असंख्य शिवसैनिकांनी ‘पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले. याप्रसंगी शहर प्रमुख (अकोला पूर्व) अतुल पवनीकर, महिला संघटिका देवश्री ठाकरे, नगरसेविका मंजूषा शेळके , नगरसेवक गजानन चव्हाण, शहर संघटक तरुण बगेरे, मा. नगरसेवक शरद तुरकर, शशी चोपडे, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, युवासेना शहर प्रमुख नितीन मिश्रा, तालुका प्रमुख सरिता वाकोडे, रेखा राऊत, नीलिमा तिजारे, वर्षा पिसे, योगेश गीते, संजय अग्रवाल, बबलू उके, प्रकाश वानखडे, संतोष रणपिसे, राजेश इंगळे, दीपक पांडे, कुणाल शिंदे, अविनाश मोरे, डॉ.मनोज शर्मा, रोशन राज, संदीप सुतार, देवा गावंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.काँग्रेस आंदोलनाच्या तयारीत!मनपातील विरोधी पक्षनेता साजीद खान यांच्यासह काँग्रेस नेते रमाकांत खेतान, प्रदेश प्रवक्ते डॉ.सुधीर ढोणे, नगरसेवक मोहम्मद इरफान खान, जमीर बर्तनवाले, गणेश कळसकर, आसिफ मकसूद खान, सय्यद शहजाद, मो.इद्रीस, विकास डोंगरे, पप्पू मोरे, सागर शिरसाट, धम्मा मोरे, शुभम डाबेराव, अजय कुचर, अंकुश केवतकर, नोमान खान यांनी रतनलाल प्लॉट चौकात पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून मनपा प्रशासनाचा निषेध नोंदवला. यापुढे शहरातील रस्त्यांसाठी काँग्रेस तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे साजीद खान यांनी स्पष्ट केले.उप अभियंत्यांनी दिले आश्वासनसंतप्त शिवसैनिकांनी ‘पीडब्ल्यूडी’ कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देताच शहर उप कार्यकारी अभियंता श्रीराम पटोकार यांनी अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनपर्यंत नवीन डांबरी रस्त्याचे निर्माण करण्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांना लेखी आश्वासन दिले. तसेच कंत्राटदाराला काळ््यात यादीत टाकण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.