बोरगाव मंजू (अकोला): प्रवाशी घेउन जात असलेल्या वाहनाला भरधाव शिवशाही बसने धडक दिली. यामध्ये आठ प्रवाशी जखमी झाले. ही घटना १९ जुलै रोजी राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजूजवळ घडली. या अपघातामुळे काही वेळ वाहतुक ठप्प झाली होती. जखमींना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बोरगावमंजू येथून प्रवाशी घेउन खासगी वाहन क्र.एमएच २७ एआर ३८२२ अकोल्याकडे जात होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजूजवळ मूर्तिजापूरकडून अकोला कडे जाणाऱ्या शिवशाही बस क्रमांक एमएच. ०९ ईएम १४७५ ने प्रवशी वाहनास मागून जबर धडक दिली. बसच्या धडकेने प्रवाशी वाहन रस्त्याच्या खाली उतरले. यामध्ये आठ प्रवाशी जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात हलविले. या प्रकरणी वृत्त लिहीस्तोवर बोरगावमंजू पोलिसात गुन्हा दाखल नव्हता. पुढील तपास ठाणेदार हरिश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.(वार्ताहर)
शिवशाही बसची प्रवाशी वाहनास धडक : आठ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 17:40 IST
बोरगाव मंजू (अकोला): प्रवाशी घेउन जात असलेल्या वाहनाला भरधाव शिवशाही बसने धडक दिली. यामध्ये आठ प्रवाशी जखमी झाले.
शिवशाही बसची प्रवाशी वाहनास धडक : आठ जखमी
ठळक मुद्दे ही घटना १९ जुलै रोजी राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजूजवळ घडली. या अपघातामुळे काही वेळ वाहतुक ठप्प झाली होती.जखमींना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.