इंदिरा गांधी जयंतीनिमित्त शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:54 AM2017-11-20T01:54:29+5:302017-11-20T01:54:40+5:30
‘मेरा खून का कतरा, देश के काम आयेगा’ या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या अमरवाणीची अभिवादन शोभायात्रा रविवारी महानगरात मोठय़ा भाव पूर्ण वातावरणात काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘मेरा खून का कतरा, देश के काम आयेगा’ या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या अमरवाणीची अभिवादन शोभायात्रा रविवारी महानगरात मोठय़ा भाव पूर्ण वातावरणात काढण्यात आली.
स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी दिनाच्या निमित्ताने अविनाश देशमुख मित्र मंडळाच्या वतीने स्व. इंदिरा गांधी अभिवादन शोभायात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होती. स्व. इंदिरा गांधी यांच्या ऐतिहासिक राष्ट्रीय भाषणांची ऑडिओ टेप या आकर्षक रथात स्व. इंदिरा गांधी यांच्या तैलचित्रासमोर वाजविण्यात आली. स्थानीय स्वराज्य भवन प्रांगणातून ही रॅली प्रारंभ झाली. माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, माजी आ. लक्ष्मणराव तायडे, डॉ. सुभाष कोरपे, संयोजक अविनाश देशमुख, दादा मते, मनपा नेते साजिद खान पठाण, प्रकाश तायडे, राजेश भारती, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, नगरसेवक पराग कांबळे, अनंतराव बगाडे, चंद्रकांत सावजी, प्रदीप वखारिया, दिनेश शुक्ला, आझाद खान, कपिल रावदेव, तश्वर पटेल डॉ. स्वाती देशमुख, महिला अध्यक्ष सुषमा निचळ, सीमा ठाकरे,विजया राजपूत आदींनी इंदिरा गांधी यांच्या तैलचित्रावर पुष्प वर्षाव करून रॅलीस प्रारंभ केला. स्व. गांधी यांच्या भाषणांची ऐतिहासिक राष्ट्रीय ऑडिओ टे पच्या भाषणांमुळे कार्यकर्त्यात जल्लोष निर्माण झाला होता. ही शोभायात्रा धिंग्रा चौक, गांधी रोड, सिटी कोतवाली, टिळक मार्ग, जुने कापड बाजार, सराफ बाजार, गांधी चौक मार्गे गांधी जवाहर बाग येथे पोहचून येथे या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. पाठ संचालन प्रकाश तायडे व कपिल रावदेव यांनी केले.
यावेळी, आलमगीर खान, सौरभ चौधरी, अंशुमन देशमुख, आकाश कवळे, अंकुश पाटील, इरफान खान, रहमान बाबू, अविनाश राठोड, पुष्पा देशमुख, शिवानी किटे, नवनीत राजपूत, विशाल इंगळे, चेतन कोंडाणे, राहुल थोटांगे, मुन्ना धांडे, रमेश समुद्रे, घनश्याम भटकर समवेत मित्र मंडळाचे आनंद वानखडे, देवीलाल तायडे, राजू इटोले, महेंद्र सुतार, प्रमोद बनसोड, सागर कावरे, सुनील रत्नपारखी, प्रवीण इंगळे, नीलेश पाटील, गजानन वानखडे, प्रकाश सोनोने, शरद टाले, रुपेश कांबळे, नीलकंठ तायडे, हारून शाह, हुसेन लीडर, इस्माईल ठेकेदार, इस्माईल टीव्हीवाले, सागर ढोरे, पिंटू अंजनकर, मंगेश वानखडे, राहुल थोटांगे, प्रशांत देशमुख, राजू राजनकर, गणेश डिडोळकर, उमेश टेकाडे, निखिल खडांगे, पंकज खिराडे, आकाश तांबोळी, आकाश शिरसाट, सोनू देशमुख, निसार शहा. समवेत पदाधिकारी, कार्यकर्ते व इंदिरा गांधी यांचे चाहते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.