अकोला : कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना, अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात आयसोलेशन कक्षात उपचारार्थ दाखल असलेल्या कोरोनाबाधीत रुग्णाने गळ्यावर ब्लेडचे वार करून आत्महत्या केल्याची घटना शनिवार, ११ एप्रिल रोजी उघडकीस आली. मयत रुग्णाचे नाव मोहम्मद जहरुल इस्लाम (वय ३०वर्षे) असे असून तो मूळचा सालपडा जि. नागाव,आसाम येथील रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोना संसर्गित रुग्ण म्हणून ७ एप्रिल रोजी दाखल झालेला रुग्ण शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गळा कापलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये रक्तबंबाळ असल्याचे दिसून आले. रुग्णालय स्टाफच्या लक्षात येताच त्याचेवर उपचार सुरू करण्यात आले. शस्त्रक्रिया सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असे अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अकोला यांनी कळवले आहे. मयत रुग्णाचे नाव मोहम्मद जहरुल इस्लाम (वय ३०वर्षे) असे असून तो मूळचा सालपडा जि. नागाव,आसाम येथील रहिवासी आहे. शुक्रवार १० रोजी आलेल्या अहवालात हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत, असेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळवले आहे.
धक्कादायक ...आसामच्या कोरोनाबाधित रुग्णाची अकोल्यात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 10:59 AM
शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गळा कापलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये रक्तबंबाळ असल्याचे दिसून आले.
ठळक मुद्देरुग्णालय स्टाफच्या लक्षात येताच त्याचेवर उपचार सुरू करण्यात आले.शस्त्रक्रिया सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.