जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार, रविवार संपूर्ण संचारबंदीचा आदेश दिला आहे. तसेच इतर दिवशी बाजारपेठ सुरू ठेवण्याची परवानगी आहे. सोमवार ते शुक्रवार या दरम्यान, सकाळी ९ ते सायंकाळ ५ वाजतापर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत; मात्र शहरात ५ वाजतानंतरही दुकाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच बाजारपेठेत गर्दी वाढली असून, कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन संबंधित दुकानचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
-------------------------------
बाजारपेठेत वाढली गर्दी; नियमांचे उल्लंघन!
व्यावसायिकांची अडचण लक्षात घेता अटी व शर्थींवर बाजारपेठ खुली ठेवण्याचे आदेश आहेत; मात्र बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. तसेच दुकानात कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत आहे. ग्राहकांसह दुकानचालक विनामास्क दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे.
-----------------------------------
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची गरज!
प्रतिबंधित वेळेतही बाजारपेठेत दुकाने सुरू असल्याने या दुकानांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.