लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रविवारी सिनेट निवडणुकीसाठी रालतो विज्ञान महाविद्यालयासह अकोट, पातूर येथील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सिनेट निवडणुकीसाठी अकोल्यात अल्प म्हणजे केवळ ३९ टक्केच मतदान झाले. पदवीधर मतदारसंघात तर सर्वात कमी ३१ टक्केच मतदान झाले. १७ ऑक्टोबर रोजी अमरावती विद्यापीठात मतमोजणी आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सिनेट, विद्वत, अभ्यास मंडळ आदी प्राधिकारणीवर प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी प्राचार्य मतदारसंघ, शिक्षण संस्था, शिक्षक मतदारसंघ, नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघ, अभ्यास मंडळ मतदारसंघामध्ये एकूण २0५ उमेदवार उभे ठाकले होते. रविवार १५ ऑक्टोबर रोजी पाचही जिल्हय़ामधील ६७ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सिनेट निवडणुकीसाठी अकोला, अमरावती, बुलडाणा, यव तमाळ आणि वाशिम जिल्हय़ामधून १६ हजारावर पदवीधरांनी नोंदणी केली होती. ३३९१ मतदारांपैकी १३00 मतदारांनी म तदान केले. उमेदवारांनी काही दिवसांपासून पाचही म तदारसंघामध्ये प्रचाराची धूम सुरू होती. सर्वाधिक चुरस ही पदवीधर मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली. पदवीधर म तदारसंघामध्ये सर्वात जास्त उमेदवार रिंगणात उभे ठाकले होते. त्याखालोखाल शिक्षक मतदारसंघात उमेदवार उभे होते. रविवारी रालतो विज्ञान महाविद्यालयामध्ये शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदारांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. अकोला जिल्हय़ातून प्राचार्य मतदारसंघ, शिक्षण संस्था, शिक्षक मतदारसंघ, नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघ, अभ्यास मंडळ म तदारसंघामध्ये एकूण ३५ उमेदवार उभे होते. मतदान केंद्र प्रमुख म्हणून रालतो विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, मतदान अधिकारी म्हणून विक्रांत मालविया, अनिल घोम यांनी काम पाहिले.
‘या’ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत सीलबंदप्राचार्य मतदारसंघ, शिक्षण संस्था, शिक्षक मतदार संघ, नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघ, अभ्यास मंडळ मतदारसंघामध्ये अकोल्यातील डॉ. श्रीप्रभू चापके, डॉ. मधुकर पवार, डॉ. अंबादास कुलट, डॉ. जगदीश साबू, डॉ. संतोष ठाकरे, संस्था प्रतिनिधी गटातून तुळशीदास मिरगे, डॉ. ज्ञानदेव इंगळे, डॉ. मम ता इंगोले, प्रा. विवेक हिवरे, रवींद्र मुंडरे, डॉ. डी.ई. उंबरकर, अनिता काळमेघ, प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, संजय देशमुख, उमेश कुळमेथे, समीर गडकरी, गजानन मानकर, रवींद्र तायडे, प्रदीप थोरात, अनिता चोरे, विवेक बोचे, श्रीकांत सातारकर, डॉ. मुकुंद इंगळे, डॉ. राजकुमार राठोड, श्रीकृष्ण काकडे, संतोष ठाकरे, डॉ. किरण खंडारे, डॉ. किसन मेहरे, भास्कर पाटील, मो. अमजद काझी, डॉ. किशोर देशमुख, डॉ. प्रशांत कोथे, डॉ. आनंद काळे, डॉ. बंडू किर्दक, संध्या काळे आदी उमेदवारांचे भाग्य रविवारी मतपेटीत सीलबंद करण्यात आले.