-----------------------------------------------
दलित वस्तीतील कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे
चिखलगाव: गेल्या काही दिवसांपासून येथे दलित वस्तीचे कामे सुरू आहेत. ही कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. याकडे सरपंच, ग्रामसेवक, प्रशासक व कंत्राटदार अमोल कदम यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
-----------------------------------
वृक्षांना आगी लावण्याचे प्रकार वाढले
वरुर जऊळका: अकोट तालुक्यातील वरूर जऊळका-अकोट या मार्गावरील दोन्ही बाजूस असलेल्या वृक्षांना रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून आगी लावण्याचे प्रकार वाढले आहे. आग लावल्यानंतर चार दिवसांत वृक्षांची विल्हेवाट लावण्यात येते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. (फोटो)
--------------------------------------
उरळ येथे आणखी एक ‘पॉझिटिव्ह’
उरळ: जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार उरळ येथे आणखी एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
--------------------------------