अकोला: जिल्हा परिषदेच्या विविध विभागात झाडाझडती घेत, कार्यालयात नियोजित वेळेपेक्षा उशिराने येणाºया लेटलतीफ १०८ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटीयार यांनी शुक्रवारी कारणे दाखवा (शो कॉज) नोटीस बजावली. त्यामुळे जिल्हा परिषदेतील संबंधित कर्मचाºयांना कार्यालयात उशिरा येणे चांगलेच भोवले.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी २८ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद परिसरातील सामान्य प्रशासन, लघुसिंचन, समाजकल्याण, पशुसंवर्धन, महिला बालकल्याण, पंचायत, बांधकाम, कृषी, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा इत्यादी विभागाच्या कार्यालयांना अचानक भेट दिली. संबंधित विभागातील कार्यालयांमध्ये नियोजित वेळेपेक्षा उशिरा येणाºया कर्मचाºयांची माहिती ‘सीईओं’नी घेतली. त्यामध्ये विविध विभागांतील कार्यालयांमध्ये १०८ कर्मचारी नियोजित वेळेपेक्षा कार्यालयात उशिरा आल्याचे आढळून आले.त्यामुळे कार्यालयात उशिरा येणाºया जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील १०८ कर्मचाºयांना मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून तातडीने स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ‘शो कॉज’ बजावल्याने, कार्यालयात उशिरा येणाºया जिल्हा परिषदेच्या संबंधित कर्मचाºयांना चांगलेच भोवले आहे.
हे आहेत लेटलतीफ अधिकारी, कर्मचारीकार्यालयात उशिरा आल्याचे आढळून आलेल्या जिल्हा परिषदेच्या १०८ कर्मचाºयांना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ‘शो कॉज’ बजावली आहे. त्यामध्ये ११ सहायक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि ९७ विविध संवर्गातील कर्मचाºयांचा समावेश आहे.