अकोला: जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागातील कनिष्ठ सहायकाला परस्पर कार्यमुक्त करण्याचा प्रताप घडला आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाला कोणतीच माहिती न देता हा प्रकार घडल्याने मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी जे. एस. मानमोठे यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती आहे.वित्त व लेखा विभागात कार्यरत कनिष्ठ सहायक अरविंद कुरई यांना विभागातूनच कार्यमुक्त करण्यात आले. त्यासाठी वित्त विभागाने आस्थापनेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि इतरही सोपस्कार पार पाडणाºया सामान्य प्रशासन विभागाला अंधारात ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद मुख्यालयात कार्यरत असताना सामान्य प्रशासन विभागाच्या मंजुरीशिवाय अधिकारी-कर्मचाºयांना कार्यमुक्त करता येत नसताना वित्त विभागाने हा प्रताप केला आहे. कनिष्ठ सहायक कुरई यांना कार्यमुक्त करून त्याबाबतची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आली. हा प्रकार सामान्य प्रशासन विभागाला गृहीत धरून निर्णय घेण्यासारखा आहे. त्यामुळे याप्रकरणी मुख्य लेखा व वित्त अधिकारी जे. एस. मानमोठे यांनी परस्पर संबंधित कर्मचाºयाला कार्यमुक्त कसे केले, ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाºयांसमोर उपस्थित झाली. त्यामुळे याप्रकरणी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मानमोठे यांना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचाºयाला नियमबाह्यपणे कार्यमुक्त केल्याप्रकरणी मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांच्या अडचणी वाढणार आहेत.- समितीपुढे हिशेब ठेवण्यालाही बगलविशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या विविध योजना, निधीचा खर्च, उपकरातून केलेली तरतूद, झालेला खर्च याचा तिमाही हिशेब अर्थ समितीपुढे ठेवून त्याला मंजुरी घेण्याचे जिल्हा परिषदेच्या लेखासंहितेत नमूद आहे; मात्र त्याकडेही पूर्वीप्रमाणेच दुर्लक्ष केले जात असल्याचीही माहिती आहे.