अकोला, दि. १२: जिल्हय़ातील पातूर तालुक्यात दोन शौचालय बांधकामात अनियमितता झाल्याच्या मुद्दय़ावर पातूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यास (बीडीओ) कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत सोमवारी देण्यात आले. पातूर तालुक्यात दोन शौचालय बांधकामासाठी शोषखड्डय़ाच्या कामात अनियमितता झाल्याचा मुद्दा सदस्य राजेश खोने यांनी सभेत उपस्थित केला. त्यानुषंगाने यासंदर्भात पातूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून अहवाल मागविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी सभेत सांगितले. समितीच्या मागील सभेच्या इतवृत्ताला या सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.समाजकल्याण, महिला बालकल्याण समितीची सभा निर्णयाविना!जिल्हा परिषद समाजकल्याण समिती आणि महिला व बालकल्याण समितीची सभा सोमवारी घेण्यात आली; मात्र या दोन्ही समितींच्या सभेत केवळ मागील सभेच्या इतवृत्ताला मंजुरी देण्यात आली. इतर विषयावर कोणतीही चर्चा आणि निर्णय घेण्यात आला नसल्याने, दोन समितींच्या सभा निर्णयाविनाच पार पडल्या. या सभेला संबंधित सभापतींसह समितींचे सदस्य उपस्थित होते.
पातूर ‘बीडीओं’ना कारणे दाखवा नोटीस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2016 3:01 AM