शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

‘एसएमएस’ दाखवा, वीज बिल भरा!

By admin | Published: July 05, 2017 7:52 PM

महावितरणची ‘पेपरलेस’कडे वाटचाल : वीज ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वीज ग्राहकांना सर्व सेवा आॅनलाइन पुरविण्यावर भर देत असलेल्या महावितरणने वीज बिलासंदर्भातही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वीज बिलाबाबत महावितरणच्यावतीने ग्राहकांना मोबाइलवर देण्यात आलेल्या एसएमएसच्या आधारावर वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने राज्यभरातील ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. वीज देयक न मिळण्याच्या वाढत्या समस्यांवर उपाय म्हणून घेण्यात आलेला हा निर्णय म्हणजे महावितरणचे ‘पेपरलेस’ व्यवहाराच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.वीज ग्राहकांना विविध सुविधा आॅनलाइन देण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून महावितरणकडून वीज बिलाची माहिती व इतर सुविधा मोबाइलवर देण्यात येत आहेत. राज्यभरातील सुमारे १ कोटी ३९ लाख वीज ग्राहकांनी आपल्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. या ग्राहकांना महावितरणच्या वीज बिलाचा तपशील एसएमएसद्वारे संबंधित मोबाइलवर पाठविण्यात येतो. या एसएमएसमध्ये ग्राहक क्रमांक, वीज बिलाची रक्कम तसेच वीज बिल भरण्याची अंतिम तारीख याचा समावेश असतो. राज्यभरातील अशा ग्राहकांना आता मोबाइलवरील एसएमएस दाखवून महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रात वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा महावितरणचा प्रयत्न असून, एसएमएसद्वारे ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार महावितरणने ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. मोबाइल क्रमांकाची करा नोंदणी!वीज ग्राहकांनी मोबाइल क्रमांक नोंदविण्यासाठी मोबाइलमध्ये ‘एमआरईजी’ हा शब्द कॅपिटलमध्ये टाइप करून स्पेस देऊन आपला बारा आकडी ग्राहक क्रमांक टाकावा व ९२२५५९२२५५ या क्रमांकावर पाठवून द्यावा, तसेच १८००२३३३४३५/१८००२००३४३५ व १९१२ या टोल फ्री क्रमांकावरही नोंदणी करता येते. महावितरणचे संकेतस्थळ,. मोबाइल अ‍ॅपवरही नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.जिल्ह्यात दीड लाख ग्राहकांनी केली नोंदणीमहावितरणचे मोबाइल अ‍ॅप डाउनलोड केलेल्या ग्राहकांसाठीही मोबाइल क्रमांकाची नोंदणी करणे गरजेचे आहे. यामुळे मोबाइल क्रमांकांची नोंदणी करण्याकडे वीज ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. अकोला परिमंडळांतर्गत अकोला जिल्ह्यातील १ लाख ४८ हजार वीज ग्राहकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे.