अकोला: बाळापुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरानजीक असल्ल्या गिरनार होंंडा या शोरुमला अचानक आग लागल्याने सर्व्हिसींगसाठी आलेले पाच ते सहा टीप्पर जळून खाक झाल्याची घटना दि.१४ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या आगीत शोरुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, लाखो रुपयांची हानी झाली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर रिधोरानजीक गिरनार होंडा शोरुम असून, तेथे ट्रक सर्व्हिसिंगसाठी येतात. शोरुमच्या मागील बाजूस असलेल्या टॉवरमध्ये शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक आगीचा भडका झाल्याने तेथे असलेल्या टीप्परलाही आगीने कवटाळले. या आगीत पाच ते सहा टीप्पर जळून खाक झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महापालीकेच्या अग्निशमन विभागाचे सहा बंब तेथे पोहोचले होते. शर्थीच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविता आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर बाळापूर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. आगीमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सूदैवाने या आगीत जीवीत हानी झाली नाही.