असे वाढले दर (प्रति किलो)
श्रावणाआधी आताचे दर
भगर ९८ १२०
शेंगदाणे ११६ १०४
साबुदाण्याचे दर स्थिर
गत काही दिवसांपासून श्रावण महिना सुरू आहे. त्यामुळे उपवासासाठी साबुदाण्याची मागणी वाढली आहे. इतर पदार्थ्यांच्या दरात चढ-उतार होत असले तरी साबुदाण्याचे दर स्थिर आहेत. साबुदाण्याला किलोमागे ५५-६० रुपये दर मिळतो.
आवक घटली, मागणी वाढली!
साबुदाणा
जिल्ह्यात उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली असली तरी पुरवठा वेळेवर होत आहे. त्यामुळे साबुदाण्याचे दर स्थिर आहे.
शेंगदाणा
तेलाचे दर वाढत आहे; पण शेंगदाण्याच्या दरात घसरण झाली आहे. निर्बंध हटल्याने पुरवठा सुरळीत सुरू आहे.
मागणी दुप्पट वाढली!
गत काही दिवसांपासून निर्बंधांमध्ये सूट मिळाल्याने मालाचा पुरवठा वेळेवर होत आहे. श्रावण असल्याने उपवासाच्या साहित्याची मागणी वाढली आहे. दरात चढ-उतार होत आहे.
- राजेश शेळके, किराणा विक्रेता