अकोला:शेतकर्यांना गरजेनुसार रक्कम देण्यास टाळाटाळ करून त्यांची बोळवण करणार्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेला शिवसेनेने बुधवारी घेराव घातला. जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी ह्यएसबीआयह्णचे विभागीय व्यवस्थापक मुंकूद उपासने यांना शेतकर्यांचे हक्काचे पैसे तातडीने द्या,अन्यथा बँकेचे कामकाज बंद पाडू असा सज्जड दम भरताच विभागीय व्यवस्थापकांनी क्षणाचाही विलंब न करता शेतकर्यांच्या मागणीनुसार त्यांना पैसे देण्याचे निर्देश जारी केले.शेतीच्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असली तरी शेतात काम करणार्या मजूरांना पैसे देण्यासाठी शेतकर्यांचे खिसे रिकामेच असल्याची परिस्थिती आहे. तूर खरेदीसाठी नाफेडने आखडता हात घेतल्यामुळे शेतकर्यांच्या घरात हजारो क्विंटल तूर पडून आहे. सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ज्या शेतकर्यांनी २७00 रूपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन आणि नाफेडकडे तूर विक्री केली, त्यांचे पैसे बँकेत जमा झाले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जिल्हाभरातील शाखांमधून आवश्यकतेनुसार पैसे दिले जात नसल्यामुळे शेतकर्यांसमोर भलतेच संकट उभे ठाकले आहे. शेतीची मशागत केल्यानंतर मजूरांचे पैसे देण्यास शेतकर्यांजवळ पैसाच उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. बँकेक डे गरजेनुसार २५-३0 हजार रूपयांची मागणी केली असता केवळ ३ हजार किंवा ५ हजार रूपये शेतकर्यांच्या हातावर टिकवून त्यांची बोळवण केली जात आहे. शेतकर्यांप्रति बँकांच्या उदासिन आणि निष्क्रीय धोरणामुळे जिल्हाभरातील शेतकर्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतकर्यांनी ही कैफियत शिवसेनेकडे मांडल्यानंतर बुधवारी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात ह्यस्टेट बँक ऑफ इंडियाह्णच्या मुख्य शाखेवर हल्लाबोल करण्यात आला. मुख्य शाखेचे विभागीय व्यवस्थापक मुकूंद उपासने यांना घेराव घालून कोणाच्या आदेशानुसार शेतकर्यांना कमी रक्कम देण्यात येत आहे,अशी जिल्हाप्रमुख देशमुख यांनी विचारणा केल्यानंतर अशा प्रकारचे कोणाचेही आदेश नसल्याचे विभागीय व्यवस्थापकांनी सांगितले. शेतकर्यांची अडवणूक करणे बंद करा, अन्यथा या क्षणापासूनच बँकेचे कामकाज बंद पाडू असा दम जिल्हाप्रमुखांनी भरताच विभागीय व्यवस्थापक उपासने यांनी जिल्हाभरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला पत्र लिहून शेतकर्यांच्या मागणीनुसार त्यांना पैसे अदा करण्याचे निर्देश दिले.
शिवसेनेचा ‘एसबीआय’ला घेराव
By admin | Published: May 17, 2017 2:58 PM