अकोला: वर्षातील ३६५ दिवस पेट्रोल पंप सुरू ठेवणाऱ्या पेट्रोलियमच्या तिन्ही कंपन्यांची मागणी येत्या १४ मेपासून पूर्ण होण्याची शक्यता आहे. येत्या १४ मेपासून पेट्रोल पंप दर रविवारी बंद राहणार असल्याचे संकेत आहेत, अशी माहिती अकोला पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष राहुल राठी यांनी दिली.कॉन्सरटम आॅफ इंडिया पेट्रोलियम डिलर असोसिएशनचे अध्यक्ष ए.डी. सत्यनारायण आणि सचिव एम. नारायण प्रसाद यांच्या निर्देशान्वये ही कारवाई आता देशभरात सुरू होत आहे. ८ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला गेला आहे. पेट्रोल-डिझेल असोसिएशनच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यापुढे रविवारी साप्ताहिक सुटी घालविता येणार आहे. वर्षातील सर्व दिवस या कर्मचाऱ्यांना आणि मालकांना सेवा द्यावी लागत होती. अनेक दिवसांपासून साप्ताहिक सुटीची मागणी रेंगाळलेली होती; मात्र या प्रस्तावास आता मंजुरी मिळाली असून, येत्या १४ मेपासून पेट्रोल पंप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी साप्ताहिक सुटी घ्यावी, असे निर्देश मिळाले आहेत.
१४ मेपासून पेट्रोल पंप रविवारी बंद राहण्याचे संकेत
By admin | Published: April 17, 2017 2:00 AM