शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

हद्दवाढीच्या अहवालावर विभागीय आयुक्तांची स्वाक्षरी

By admin | Published: July 02, 2016 2:23 AM

त्रुटी पूर्ण करण्याचे मनपासमोर आव्हान

अकोला: महापालिकेने प्रस्तावित केलेल्या हद्दवाढीच्या अहवालावर तत्कालीन विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांनी स्वाक्षरी केली आहे. येत्या दोन दिवसांत हद्दवाढीचा अहवाल शासनाकडे पाठवल्या जाणार असून अहवालातील संभाव्य त्रुट्या दूर करण्याचे आव्हान मनपासमोर राहणार आहे. महापालिकेची सप्टेंबर २00१ मध्ये स्थापना झाल्यानंतर नियमानुसार तीन वर्षांच्या आतमध्ये मनपा क्षेत्राची हद्दवाढ होणे अपेक्षित होते. त्यानुषंगाने प्रशासनाने वेळोवेळी शासनाकडे अहवालदेखील सादर केले. पालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील लोकसंख्या, त्यांचे दरडोई उत्पन्न, ग्रामीण भागात उपलब्ध असणार्‍या मूलभूत सोयी-सुविधा या सर्व बाबी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी ऑक्टोबर २0१५ मध्ये हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. नागरिकांच्या हरकती व सूचना जाणून घेण्यासाठी शासनाने १६ मार्च रोजी हद्दवाढीची अधिसूचना जारी केली. त्यानुसार सुमारे १ हजार ४३५ जणांच्या हरकती व सूचना अमरावती कार्यालयाला प्राप्त झाल्या. तत्कालीन विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर यांच्याकडे या प्रकरणी तीन वेळा सुनावणी होऊन १७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अंतिम सुनावणी पार पडली. हद्दवाढीचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठवण्यापूर्वी जून महिन्यात तत्कालीन विभागीय आयुक्तांनी शहरालगतच्या गावांची पाहणी केली होती. हद्दवाढीच्या अहवालावर तत्कालीन विभागीय आयुक्तांनी स्वाक्षरी केली असून सदर अहवाल येत्या दोन दिवसांत शासनाकडे सादर केला जाणार आहे. मनपाच्या उत्पन्नात केवळ एक कोटीने वाढ २0१0-११ च्या जनगणनेनुसार अकोला शहराची लोकसंख्या ४ लाख २५ हजार ८१७ असून पालिकेचे उत्पन्न १0७ कोटींच्या आसपास आहे. हद्दवाढ झाल्यास शहरानजीकच्या २४ गावांमधील १ लाख ११ हजार ३४0 लोकसंख्येचा शहरात समावेश होईल; परंतु त्या तुलनेत मनपाच्या उत्पन्नात केवळ १ कोटीने वाढ होणार असल्याची माहिती आहे. लोक प्रतिनिधी अनुकूल महापालिकेच्या हद्दवाढीसाठी स्थानिक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी अनुकूल आहेत. लोकप्रतिनिधींच्या पातळीवरसुद्धा शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत हद्दवाढ झाल्यास फेब्रुवारीमध्ये होणार्‍या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत चुरस निर्माण होईल, हे नक्की.