अकोला: महापालिका आयुक्त सोमनाथ शेटे यांची सहा महिन्यांची कारकिर्द लवकरच संपण्याची शक्यता असून शासनस्तरावर त्यांच्या बदलीच्या हालचाली सुरू आहेत. येत्या पंधरा दिवसात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सक्षम अधिकार्यांच्या नियुक्तीसाठी भाजपने शासन स्तरावर प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. डॉ. महेंद्र कल्याणकर यांची अवघ्या दहा महिन्यात बदली झाल्यानंतर वर्धा नगरपालिकेचे मुख्याधिकारी असलेले सोमनाथ शेटे यांनी ११ फेब्रुवारी २0१५ रोजी मनपाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या कारकिर्दीचा सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत सर्वच स्तरावर नाराजीचा सूर आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप-शिवसेनेची बदनामी होत आहे. हीबाब भाजपच्या प्रदेशस्तरावर पोहोचली असून, आयुक्त शेटे यांच्या बदलीबाबतही शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.
आयुक्तांच्या बदलीचे संकेत
By admin | Published: August 19, 2015 1:54 AM