लोकमत न्यूज नेटवर्क, अकाेला : ‘लाेकमत’चे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच ‘लाेकमत’ अकाेला आवृत्तीचा रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती साेहळा शनिवार, १० जून राेजी आयाेजित करण्यात आला आहे. राज्यपाल रमेश बैस या साेहळ्याचे मुख्य अतिथी आहेत.
यापूर्वी २७ मे राेजी आयाेजित करण्यात आलेला हा साेहळा काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात आला हाेता, आता शनिवारी सकाळी ११:०० वाजता रिधाेरा राेडवरील हाॅटेल जलसा येथे हा साेहळा आयाेजित केला आहे. साेहळ्याला राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार प्रमुख अतिथी आहेत. लाेकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन डाॅ. विजय दर्डा यांच्या उपस्थितीत, लाेकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली हा साेहळा हाेत आहे. यावेळी पश्चिम वऱ्हाडातील विविध तालुके व जिल्ह्यातील गत २५ वर्षांतील प्रगतीचा आढावा घेणाऱ्या ‘पंचविशी’ या विशेषांकाचे तसेच विविध क्षेत्रांतील महिलांच्या कर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या ‘वुमन ॲचिव्हर्स अवाॅर्डस्!’च्या काॅफी टेबल बुकचे प्रकाशन राज्यपाल व मान्यवरांच्या हस्ते हाेणार आहे. या कार्यक्रमात निमंत्रितांनाच प्रवेश असेल.