लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) ताब्यात असलेल्या आरोपींना बुधवारी एटीएसच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या आरोपींविरुद्ध असलेला एक खटल्याची सुनावणी सुरू झाली असून, पुसद प्रकरणाचीही सुरुवात तत्काळ करावी, असे निवेदन आरोपींच्या वकिलांनी विशेष न्यायालयात दिले.औरंगाबाद दहशतवादविरोधी पथक (एटीएस) ने अकील खिलजी याला मार्च २0१२ मध्ये खंडवा येथून अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून औरंगाबाद एटीएसने अकोला एटीएसला काही नावे दिली. त्यानुसार अकोला एटीएसने अन्वर हुसैन खत्री, अबरार ऊर्फ इस्माईल, शाकीर ऊर्फ खलील खिलजी यांना चिखलीतील सैलानी येथून अटक केली होती. तेव्हापासून हे आरोपी एटीएसच्या ताब्यात आहेत, तर अकील खिलजी हा पळून गेल्यानंतर तो मध्य प्रदेशात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारल्या गेला होता. एटीएसच्या रेकॉर्डवर दहशतवादी असलेल्या या आरोपींचे खटले अकोल्यात नव्यानेच स्थापन झालेल्या एटीएसच्या विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्यापुढे या दहशतवाद्यांना बुधवारी हजर करण्यात आले. विशेष न्यायालयात त्यांच्याविरोधात पुरावे सुरू झाले आहेत. सरकार पक्षातर्फे नागपूरचे विशेष सरकारी वकील अँड. प्रशांत सत्यनाथन यांनी काम पाहिले, तर पुसद येथे अब्दुल मलीकने एका पोलिसावर चाकू मारला होता. त्याच्या चौकशीमध्ये काही नावे समोर आलीत. त्यानुसार अकोला एटीएसने अ. मलीक अ. रजाक, शोएब खा रहमान खा, सलीम मलीक ऊर्फ हाफीज मुजबीर रहेमान यांना २0१५ रोजी अटक केली होती. या आरोपींविरुद्ध असलेला खटला लवकर सुरू करण्यासाठी आरोपींचे वकील अँड. अली रजा खान यांनी एटीएसच्या विशेष न्यायालयात निवेदन सादर केले. या आरोपींपैकी मुजीबर रहेमान याची प्रकृती ठिक नसल्याचे यावेळी न्यायालयात सांगण्यात आले.
सिमीचे संशयित दहशतवादी न्यायालयासमोर हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:48 AM
अकोला : दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) ताब्यात असलेल्या आरोपींना बुधवारी एटीएसच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या आरोपींविरुद्ध असलेला एक खटल्याची सुनावणी सुरू झाली असून, पुसद प्रकरणाचीही सुरुवात तत्काळ करावी, असे निवेदन आरोपींच्या वकिलांनी विशेष न्यायालयात दिले.
ठळक मुद्देआरोपींना बुधवारी एटीएसच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलेएक खटल्याची सुनावणी सुरूपुसद प्रकरणाचीही सुरुवात तत्काळ करावी, असे निवेदन