लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने मृत्यू झालेल्या शेतकरी प्रकरणात शासनामार्फत गठित करण्यात आलेल्या विशेष तपासणी पथकाने (एसआयटी) शुक्रवारी अकोल्यात धडक देत झाडाझडती सुरू केली. कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने जिल्हय़ात शेतकर्यांचा झालेला मृत्यू आणि विषबाधा झालेल्या शेतकर्यांची ‘एसआयटी’ने तपासणी सुरू केली आहे.कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने मृत्यू झालेल्या प्रकरणांची तपासणी करण्यासाठी शासनामार्फत विशेष तपासणी पथक (एसआयटी) गठित करण्यात आली. ‘एसआयटी’च्या कार्यक्षेत्रात अकोला जिल्हय़ाचा समावेश झाल्यानंतर अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपासणी पथक ३ नोव्हेंबर रोजी अकोल्यात दाखल झाले. कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने जिल्हय़ात सात शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानुषंगाने ‘एसआयटी’ने कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने मृत्यू झालेल्या जिल्हय़ातील शेतकर्यांसह विषबाधा झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शेतकर्यांची तपासणी सुरू केली आहे. अमरावती विभागीय आयुक्त तथा विशेष तपासणी पथक प्रमुख पीयूष सिंह यांच्यासह विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे, आरोग्य सहसंचालक डॉ. नितीन नाईकवाडे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे, नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक विजय वाघमारे, के .डब्ल्यू. देशकर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी विषबाधेने मृत्यू झालेल्या शेतकर्यांची माहिती घेत विषबाधा झाल्याने उपचार घेत असलेल्या शेतकर्यांची चौकशी केली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, तहसीलदार राजेश्वर हांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
‘सवरेपचार’मध्ये भेट; विषबाधित चार शेतकर्यांची विचारपूस‘एसआयटी’ने अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयाला भेट देऊन कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने सवरेपचार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार शेतकर्यांची विचारपूस केली. त्यामध्ये अकोला जिल्हय़ातील तुकाराम कानडे (व्याळा), रवी लोखंडे (टिटवा), गोविंदा डिगांबर आमले (माळेगाव बाजार) आणि वाशिम जिल्हय़ातील अक्षय गणेश राठोड (खंडाळा) इत्यादी चार शेतकर्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची ‘एसआयटी‘ने विचारपूस केली.
आगर येथे मृतकाच्या कुटुंबीयांचे सांत्वनकीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने आगर येथील शेतकरी राजेश मनोहर फुकट यांचा मृत्यू झाला आहे. त्यानुषंगाने ‘एसआयटी’ने आगर येथे जाऊन मृतक कुटुंबीयांचे सांत्वन केले, तसेच विचारपूस करून माहिती घेतली.