अकोला: पातूर पंचायत समिती अंतर्गत सायवानी, सावरगाव व उमरा येथील ग्रामसेवक सी.एस. डाबेराव यांना निलंबित करण्या त येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अरुण उन्हाळे यांनी दिला असून, हा आदेश गुरुवारी निर्गमित करण्यात आला. ग्रामपंचायत कर वसुली न करणे, ग्रामपंचायतची मासिक सभा नियमित न घेणे, तपासणीसाठी रेकॉर्ड उपलब्ध करून न देणे, ग्रामपंचायत कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते न उघडणे, अनधिकृतरीत्या गैरहजर राहणे व इतर कारणांमुळे ग्रामसेवक डाबेराव यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिला आहे.
सायवानीचे ग्रामसेवक डाबेराव निलंबित
By admin | Published: September 12, 2014 1:19 AM