अकोला : विदर्भात यावर्षी जवळपास १ लाख ८० हजार हेक्टरवर ज्वारी पेरणी करण्यात आली असून, सहाशे हेक्टरवर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना ज्वारीचे प्रात्यक्षीक दिले आहे. यात ४०० हे्क्टर प्रात्यच्ीक खारपाणपट्ट्यात आहे.ज्वारी हे शाश्वत पीक आहे. यात सर्वाधिक पोषणमूल्य सुरक्षा असल्याने अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारीवर नवे संशोधन केले. नुकतेच पारंपरिक ज्वारीपेक्षा दीडपट उत्पादन देणारी एसपीव्ही-२३०७ ही ठोकळ दाण्याची जात विकसित केली.यावर्षी कृषी विद्यापीठाने विकसीत केलेली सीएच-३५,एसपीएस-१६३५, सीएचसी-३४,पीडीकेव्ही कल्याणी आदीसह संशोधीत जातीचे ६०० एकरावर शेतकऱ्यांना प्रात्यक्षीक दिले आहे यात खारपाणपट्ट्यातील उगवा ते चांदूर बाजारापर्यंत ४०० एकरचा समावेश आहे.कृषी विद्यापीठाने आतापर्यंत ११ ज्वारीच्या जाती विकसित केल्या आहेत.दोनवर्षापुर्वी ‘कल्याणी’ ही जात प्रसारित केली असून, ११५ दिवसांत परिपक्व होणाºया या ज्वारीचे हेक्टरी ४० क्ंिवटल उत्पादन आहे. तसेच सीएसएच-३५ कृषी विद्यापीठाची ज्वारीची जात राष्टÑीय स्तरावर प्रसारित केली. ‘हुरड्या’ची लज्जत वाढविणारी ‘पीकेव्ही कार्तिकी’ ही नवी जात या कृषी विद्यापीठाने दिली.नव्याने दोन जाती विकसित केल्या आहेत. यामध्ये रब्बी हंगामासाठी उपयुक्त एसपीएच-१८०१ जात असून, या ज्वारीचे उत्पादन ३५ ते ३८ क्विंटल आहे. वैरणाचे उत्पादनही १०० क्विंटल एवढे आहे.यातील काही ज्वारीच्या जातीचे शेतकºयांनी य्प्रात्यक्षीक घेतले आहे. यावर्षी ज्वारीची १ लाख ८० हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली असून, हे पीक उत्तम असल्याचे कृषी शास्त्रज्ञ सांगत आहेत. खारपाणपट्टयात यावर्षी ज्वारीचे क्षेत्र वाढले आहे.
यावर्षी जवळपास १ लाख ८० हजार हेक्टरवर ज्वारी पेरणी झाल्याचा अंदाज असून, सहाशे एकरावर शेतकºयांना ज्वारीचे प्रात्यक्षीक देण्यात आले आहे. हे पीक उत्तम असून, यावर्षी ज्वारी पेरणीकडे शेतकºयांचा कल वाढला आहे.डॉ.आर.बी.घोराडे,विभाग प्रमुख,ज्वारी संशोधन विभाग,डॉ. पंदेकृवि,अकोला.