शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

सहा जणांचा मृत्यू, ४७० नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:18 AM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १६३७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४१० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १६३७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४१० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२२७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील २७, पारस येथील २२, कानशिवणी व मोठी उमरी येथील प्रत्येकी १०, हिवरखेड व पातूर येथील प्रत्येकी आठ, खडकी, कौलखेड, बोरगाव मंजू व तेल्हारा येथील प्रत्येकी सहा, जीएमसी व डाबकी रोड येथील प्रत्येकी पाच, जुने शहर, गोरक्षण रोड, सिंधी कॅम्प, अडगाव, मूर्तिजापूर, टाकळी खोजबोळ, मलकापूर व बाळापूर येथील प्रत्येकी चार, बार्शीटाकळी, भौरद, कीर्ती नगर, सिरसो, लहान उमरी, राम नगर, खोलेश्वर, डोंगरगाव, वाडेगाव व शिवाजी नगर येथील प्रत्येकी तीन, रामदासपेठ, आळशी प्लॉट, कैलास टेकडी, तापडीया नगर, शिवणी, देवरावबाबा चाळ, तुकाराम चौक, जवाहर नगर, सुकळी, उरळ, कासली खुर्द, तोष्णीवाल लेआउट, रणपिसे नगर व भारती प्लॉट येथील प्रत्येकी दोन, आनंद नगर, कडोसी, व्हीएचबी कॉलनी, ओपन थेटर्स, गौतम नगर, धामणी, अकोट फैल, खैर मोहमद प्लॉट, अंदुरा, कुंभारी, एमआयडीसी, तारफैल, अंबिका नगर, रेल्वे कॉलनी, राहुल नगर, भीमनगर, शितला माता मंदिर, कान्हेरी सरप, हिंगणा फाटा, खदान, सोनटक्के प्लॉट, खिनखीनी, घुसर, पिंपळगाव, हाता, विद्या नगर, मंडुरा, कुंडा, पणज, दत्त कॉलनी, बालाजी नगर, वानखडे नगर, लहरिया प्लॉट, गुडधी, जठारपेठ, मोरेश्वर कॉलनी, कान्हेरी गवळी, मोरगाव, पाथर्डी, सिरसोली, माता नगर, सुधीर कॉलनी, लकडगंज, केशव नगर, निमवाडी, तिवसा, मोहता मिल, अनिकट, आदर्श कॉलनी, बंजारा नगर, राजनखेड, रजपूतपुरा, गायगाव, देशमुख फैल, चिखलगाव व कृषी नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी खडकी येथील १५, मूर्तिजापूर येथील १०, बार्शीटाकळी येथील नऊ, धनवडी येथील सात, कळबेश्वर येथील सहा, जठारपेठ येथील पाच, रामदासपेठ, रजपूतपुरा, जीएमसी हॉस्टेल, रवीनगर व कौलखेड येथील प्रत्येकी चार, डाबकी रोड, बोर्डी, गोरक्षण रोड, शिवसेना वसाहत येथील प्रत्येकी तीन, जुने शहर, मलकापूर, रेल, आदर्श नगर, न्यू खेतान नगर, बोरगाव मंजू येथील प्रत्येकी दोन, बैदपुरा, अकोट फैल, मनकर्णा प्लॉट, न्यू राधाकिसन प्लॉट, नायगाव, देशमुख फैल, धारेल, चोहट्टा बाजार, नखेगाव, धामणा, पनोरी, खोलेश्वर मंदिर, जांभा, दहिगाव, खेतान नगर, रतनलाल प्लॉट, गीता नगर, शिवणी, न्यू तापडीया नगर, लहान उमरी, हरिहर पेठ, खदान, तोष्णीवाल लेआउट, अंभोरा, हेंडज, शेलू वेताळ, सिरसो, राऊतवाडी, पळसोबढे, गौतम नगर, सहकार नगर, मुकुंद नगर, टेलिकॉम नगर, निवारा नगर, मोठी उमरी, सिंधी कॅम्प, संतोष नगर, गोडबोले प्लॉट, मेहरे नगर, केशव नगर, गोरेगाव, निमवाडी, व्हीएचबी कॉलनी, महान, शिवाजी नगर, वाशिम बायपास, अनंत नगर व शिव नगर, येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

सहा जणांचा मृत्यू

पळसो बढे ८० वर्षीय महिला, पातूर येथील ८० वर्षीय महिला, बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष व पोळा चौक, अकोला येथील ९० वर्षीय पुरुष अशा चार कोरोनाबाधित रुग्णांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. या चौघांनाही अनुक्रमे १४ मार्च व १६ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. अकोट येथील ६५ वर्षीय पुरुष व सावरा ता. अकोट येथील ८० वर्षीय पुरुष अशा दोघांचा सायंकाळी मृत्यू झाला. या दोघांना अनुक्रमे १५ व १७ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

४८५ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २०, ओझोन हॉस्पिटल येथील पाच, युनिक हॉस्पिटल येथून एक, नवजीवन हॉस्पिटल येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून आठ, उपजिल्हा आरोग्य मूर्तिजापूर येथील दोन, हेंडज कोविड केअर सेटर मूर्तिजापूर येथील १४, आयकॉन हॉस्पिटल येथून सहा, बिहाडे हॉस्पिटल येथून सहा, अवघाते हॉस्पिटल येथून दोन, अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून दोन, आयुर्वेदिक महाविद्यालयातून सहा, तर होम आयसोलेशनमधून ४१० अशा एकूण ४८५ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.

५,०४० ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २२,७०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १७,२५५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४१३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,०४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.