लोकमत न्यूज नेटवर्कअकोला - राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्या साठय़ाची वाहतूक व विक्री सुरू असतानाच सिटी कोतवाली पोलिसांनी बुधवारी छापा टाकून ६ लाखांचा गुटखा साठा जप्त केला. विशेष पथकाने मंगळवारी छापेमारी करीत ७0 लाखांचा गुटखा साठा जप्त केल्यानंतर पोलिसांनी पुन्हा कारवाई करीत गुटखा साठा जप्त केला आहे. पोलिसांच्या कारवायांमुळे गुटखा माफीयांचे धाबे दणाणले असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांना बुधवारी पहाटेच गुटखा साठा येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी जय महाराष्ट्र रोडलाईन्सच्या गोदामावर छापा टाकला. या गोदामातून ६ लाख ७ हजार ४४0 रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. या साठय़ामध्ये एक लाख रुपयांची पानबहार, चारमिनार व राजरत्न किवामचे पाच बॉक्स, सुगंधीत तंबाखू व आणखी गुटख्याचा साठा जप्त केला. गत दोन दिवसांपासून पोलिसांनी छापेमारी करीत तब्बल ७५ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केल्याने गुटखा माफीयांच्या पायाखालची वाळू सरकली. गुटखा माफीयांवर मोठय़ा प्रमाणात कारवाया करीत गुटखा साठा जप्त करण्यात आल्याने शहरासह जिल्हय़ात गुटखाच मिळत नसल्याचेही दिसून येत आहे. ही कारवाई ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अमीत डहारे, विपुल सोळंके, नदीम शेख, नीलेश गोरे, नीलेश पाचपवार यांनी केली.
सहा लाखांचा गुटखा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 10:53 PM
अकोला - राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्या साठय़ाची वाहतूक व विक्री सुरू असतानाच सिटी कोतवाली पोलिसांनी बुधवारी छापा टाकून ६ लाखांचा गुटखा साठा जप्त केला. विशेष पथकाने मंगळवारी छापेमारी करीत ७0 लाखांचा गुटखा साठा जप्त केल्यानंतर पोलिसांनी पुन्हा कारवाई करीत गुटखा साठा जप्त केला आहे. पोलिसांच्या कारवायांमुळे गुटखा माफीयांचे धाबे दणाणले असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
ठळक मुद्देसिटी कोतवाली पोलिसांची दुसरी कारवाईविशेष पथकाने मंगळवारी छापेमारी करीत ७0 लाखांचा गुटखा साठा जप्त केला होतापोलिसांच्या कारवायांमुळे गुटखा माफीयांचे धाबे दणाणले