शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,५८५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४८९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २,०९६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील ३८, अकोट तालुक्यातील ७४, बाळापूर तालुक्यातील ३४, तेल्हारा तालुक्यातील चार , बार्शी टाकळी तालुक्यातील १३, पातूर तालुक्यातील ८७ आणि अकोला - २३९ (अकोला ग्रामीण- ७५, अकोला मनपा क्षेत्र- १६४) रुग्णांचा समावेश आहे.
येथील रुग्णांचा झाला मृत्यू
बाळापूर येथील ७० वर्षीय महिला
गोरक्षण रोड येथील ७९ वर्षीय पुरुष
खोलेश्वर येथील ७० वर्षीय महिला
मोठी उमरी येथील ५० वर्षीय महिला
अकोट फैल येथील ६२ वर्षीय पुरुष
देऊळगाव, ता. पातूर येथील ६४ वर्षीय पुरुष
३४५ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २२, आयकॉन हॉस्पिटल येथील तीन, ओझोन हॉस्पिटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पिटल येथील पाच, नवजीवन हॉस्पिटल येथील दोन, इंदिरा हॉस्पिटल येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी दोन, केअर हॉस्पिटल येथील एक, युनिक हॉस्पिटल येथील एक, आगर हॉस्पिटल येथील दोन, जिल्हा कर्मचारी भवन येथील एक, समाज कल्याण वसतिगृह येथील सहा, आरकेटी आयुर्वेदिक महाविद्यालय येथील चार, तर होम आयसोलेशनमधील ३४५ अशा एकूण ४०३ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.
५,९७७ उपचाराधीन रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४३,१२१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३६,४०१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ७४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,९७७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
=