अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवार, ७ एप्रिल रोजी आणखी सहा जणांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा ४८४ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १११, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये ९१, अशा एकूण २०२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या २९,४९७ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १२७९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११६८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कौलखेड व मोठी उमरी येथील नऊ, पारस येथील सहा, खडकी येथील चार, खोलेश्वर, गोरक्षण रोड, शास्त्री नगर, लहान उमरी येथील प्रत्येकी तीन, तेल्हारा, सिंधी कॅम्प, मित्र नगर, जीएमसी, रतनलाल प्लॉट, राऊत वाडी, गांधी रोड, पैलपाडा आणि बाभुळगाव येथील प्रत्येकी दोन, उर्वरीत अंदुरा, दहिगाव ता. तेल्हारा, गाडेगाव, दापुरा, हिवरखेड, सौंदळा, अकोट, रामदास पेठ, शिवर, खरप, चौरे प्लॉट, शंकर नगर, तुकाराम चौक, कीर्तीनगर, हिंगणा फाटा, सुधीर कॉलनी, हातरुण, सस्ती, उमरी, व्हीएचबी कॉलनी, रामनगर, गोडबोले प्लॉट, डाबकी रोड, कलाल ची चाळ, जयहिंद चौक, दगडी पूल, देवराव बाबाची चाळ, राजंदा, तारफैल, बापू नगर, शेळद, गोकुळ कॉलनी, जठारपेठ, बोरगाव मंजू, न्यू तापडीया नगर, महसूल कॉलनी, दहातोंडा, गाडगे नगर, हिंगणा रोड, शिवसेना वसाहत, सावरगाव, देऊळगाव, पातूर, माळराजूरा, आगीखेड, चैतन्य नगर, सिंदखेड, बाळापूर, आझाद कॉलनी, राजनखेड, बार्शी टाकळी, उरळ आणि माळीपुरा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सहा जणांचा मृत्यू
अकोला शहरातील खदान भागातील ६० वर्षीय महिला, सिंदखेड ता. बार्शीटाकळी येथील ५९ वर्षीय पुरुष, पारस येथील ७० वर्षीय पुरुष, अकोला जुने शहर भागातील ५४ वर्षीय पुरुष, संत तुकाराम चौकातील ७२ वर्षीय पुरुष व रणपिसे नगर येथील ६४ वर्षीय महिला अशा सहा जणांच्या मृत्यूची नोंद बुधवारी झाली.
४,०२३ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९,४९७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २४,९९० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४८४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४,०२३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.